Crime: सासरी जाऊन पत्नीसह मेहुणीवर गोळीबार, नंतर तरुणानं जीवन संपवलं, रक्तरंजित खेळाचं धक्कादायक कारण समोर

Patna Crime: रागात तरुणाने धक्कादायक कृत्य केले आहे. पत्नीसह मेहुणीवर गोळीबार केल्याची घटना घडली आहे. नंतर तरुणाने आत्महत्या केली आहे.
Crime
CrimeESakal
Updated on

बिहारची राजधानी पटनाला लागून असलेल्या पांडरकमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. येथे एका तरुणाने आधी पत्नीवर गोळी झाडली, त्यानंतर मेहुणीवरही गोळीबार केला. यानंतर आरोपीने स्वत:वर गोळी झाडली. या घटनेत तरुण आणि त्याच्या पत्नीचा जागीच मृत्यू झाला, तर त्याच्या मेहुणीला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जिथे तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. ही घटना बारह उपविभागातील पांडरक पोलीस स्टेशन परिसरातील बिहारी बिघा गावात घडली आहे. दोघांच्या मृत्यूनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.