Indore Crime News:मध्य प्रदेशातील इंदूर शहरातील एका खासगी विद्यालयात इयत्ता चौथीमध्ये शिकत असलेल्या एका विद्यार्थ्याचा त्याच्या तीन मित्रांनीच खून केल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी उघडकीस आला आहे. शुक्रवारी(ता.२४) ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले.
खून करणाऱ्या मुलांनी कर्कटक आणि कंपासच्या साहाय्याने खून पीडित मुलावर १०० पेक्षा अधिक वार केल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेची दखल घेत स्थानिक बालकल्याण समितीने पोलिसांकडून याप्रकरणी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
या हल्ल्यामागील कारण अद्याप समजले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणातील आरोपी हे अल्पवयीन असून त्यादृष्टीने पोलिसांकडून योग्य ती पावले उचलण्यात येत आहेत. व्हिडिओ गेममधील हिंसक दृश्यांचा या मुलांच्या मनावर परिणाम झाला असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
‘‘माझ्या मुलावर शुक्रवारी दुपारी शाळेच्या आवारात त्याच्याच वर्गातील विद्यार्थ्यांनी हल्ला केला. यामागील कारण अद्याप समजलेले नाही. मी शाळेच्या व्यवस्थापनाला संबंधित घटनेचे सीसीटीव्ही फुटेज मागितले आहे, मात्र मला अद्याप सीसीटीव्ही फुटेज देण्यात आलेले नाही.’’ असा दावा पीडित मुलाच्या वडिलांनी केला. (Latest Marathi News)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.