KCR : मोदींवर टीका करा, हरकत नाही पण...; केंद्रीयमंत्र्यांचा केसीआर यांना इशारा

KCR and g kishan reddy
KCR and g kishan reddy
Updated on

नवी दिल्ली - भारतात तालिबानराज आणि अफगाणिस्तानसारखी परिस्थिती आहे, या तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या विधानावर केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी यांनी आक्षेप घेतला आहे. तसेच त्यांनी केसीआर यांना इशाराही दिला आहे. (K Chandrashekhar rao news in Marathi)

KCR and g kishan reddy
Indian Army Day 2023: भारतीय सैन्यासाठी चालू वर्ष असणार वैशिष्टपूर्ण; ताफ्यात सहभागी होणार खास शस्त्र

केंद्रीयमंत्री रेड्डी म्हणाले की, केसीआर भारतीय जनता पक्षावर टीका करू शकतात, पण देशाची प्रतिष्ठा कमी होईल असे वक्तव्य करू नये. भाजपवर अप्रत्यक्ष हल्ला चढवत केसीआर म्हणाले की, धार्मिक-जातीय कट्टरता आणि समाजात फूट पाडण्यास प्रोत्साहन दिल्यास आणीबाणीची परिस्थिती निर्माण होईल. देशात तालिबानी राजवट आणि अफगाणिस्तानसारखी परिस्थिती निर्माण होईल, असं केसीआर म्हणाले होते.

दरम्यान केसीआर कुटुंबाकडून सातत्याने असे वक्तव्य करण्यात आहेत, ज्यामुळे देशाचे प्रतिमा मलिन होतेय असा आरोप केंद्रीय मंत्र्यांनी केला आहे. भारतात बॉम्बस्फोट, संचारबंदी, जातीय दंगली आणि इतर प्रकरणे कमी झाली आहेत हे त्यांनी पहावे. जम्मू-काश्मीरमधील डल सरोवराजवळ मुस्लिमांसह अल्पसंख्याक समाजातील हजारो मुले देशहिताच्या घोषणा देत आहेत.

KCR and g kishan reddy
Chitra Wagh : 'जोपर्यंत ती पूर्ण कपडे घालत नाही.....',चित्रा वाघ यांनी उर्फीबद्दल घेतला मोठा निर्णय

देश अफगाणिस्तानसारखा होत चालला आहे का? ही तुमची बोलण्याची पद्धत आहे का? तुम्ही राजकारण करता, पण देशाचं मूल्य कमी करू नका. तुम्ही नरेंद्र मोदींवर टीका करता, हरकत नाही. आम्ही उत्तर देऊ, पण अशा प्रकारच्या टिप्पण्या करू नये, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे मूल्य कमी होते.

रेड्डी पुढं म्हणाले की, त्यांच्यासाठी देश अफगाणिस्तानसारखा होत चालला आहे का? ही तुमची बोलण्याची पद्धत आहे का? तुम्ही राजकारण करता, पण देशाची प्रतिमा कमी करू नका. तुम्ही नरेंद्र मोदींवर टीका करता, हरकत नाही. आम्ही उत्तर देऊ, पण अशा प्रकारच्या टिप्पण्या करणं योग्य नाही. ज्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे मूल्य कमी होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.