अहमदाबाद : गुजरातमधून वाहणाऱ्या विश्वामित्री नदीच्या सुरक्षित हद्दीतून बाहेर पडून बडोदा शहरातील रहिवासी भागातील पूरग्रस्त रस्त्यांवर यंदाही मगरींचा वावर पहायला मिळाला. यापैकी २१ मगरींना पुन्हा नदीत सोडण्यात आले.
वनाधिकारी करणसिंह रजपूत यांनी सांगितले, की बडोदा शहरातून विश्वामित्री नदीचा सुमारे १७ कि.मी.मार्ग जातो. या नदीत जवळपास ३०० मगरींचा अधिवास असून काठावरील रहिवाशांना मगरींचा वावर नवीन नाही. विशेषत: पावसाळ्यात मगरींची संख्या अधिक वाढते. या वर्षी जूनमध्ये चार मगरींची बडोद्याच्या रहिवासी भागातून सुटका करून त्यांना पुन्हा नदीत सोडले. जुलैमध्ये गुजरातेत अनेक ठिकाणी जोरदार पावसाने सखल भाग जलमय झाला. त्यानंतर बडोद्याच्या रस्त्यांवर अधिक मगरी दिसू लागल्या.
एका जलसंस्थेतून दुसऱ्या जलसंस्थेत जाण्यासाठी या मगरी कॅनालचा वापर करतात. नदीशी जोडलेल्या तलावातही काही मगरी आढळतात. नदीच्या काठाजवळ असलेल्या भागातून मगरींची सुटका करण्याची प्रक्रिया यापुढेही वर्षभर सुरू राहील. मगरींसारख्या वन्यप्राणी आपला मूळ अधिवास सोडण्यास पसंती देत नाही. मगरीही पुन्हा नदीत परतणे पसंत करतात, असेही त्यांनी नमूद केले.
वन्यजीव कार्यकर्ते हेमंत वधवाना यांनी सांगितले, की कधीकधी मगरी बडोद्यातील रहिवासी भागांत येण्यासाठी वादळी पावसाच्या पाण्याचा निचरा होणाऱ्या वाहिन्यांचा वापर करतात. मात्र, यंदाच्या वर्षी अद्याप अशी घटना घडली नाही. २०१९ च्या पुरात मगरी अशा प्रकारे रहिवासी भागांत आल्या होत्या.
अशा मगरी
लांबी १८ फूट
वजन ४५० किलो
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.