नवी दिल्ली : Council of Scientific & Industrial Research (CSIR) चे डायरेक्टर शेखर सी मांडे यांनी रविवारी सर्वांना आवाहन केलं आहे की, कोविड-19 संकट अद्याप समाप्त झालं नाहीये. या लढाईमध्ये निष्काळजीपणा बाळगला आणि जर कोरोनाच्या महासाथीची तिसरी लाट आली तर त्याचे गंभीर परिणाम होतील. सध्यस्थितीतून बाहेर पडण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्नांसह पर्यावरणातील बदल आणि जीवाश्म इंधनाच्या वापरामुळे निर्माण होणाऱ्या संकटाच्या परिस्थितीला टाळणं देखील आवश्यक आहे. अशा अडचणीच्या परिस्थितीत संपूर्ण मानवजातीसाठी धोका निर्माण होऊ शकतो.
शेखर मांडे राजीव गांधी सेंटर फॉर बायोटेक्नोलॉजीद्वारे आयोजित एका डिजीटल कार्यक्रमात बोलत होते. या कार्यक्रमाचा विषय कोविड-19 आणि भारताची प्रतिक्रिया असा होता. त्यांनी स्पष्ट केलं की, भारत अद्याप सामुदायिक प्रतिकार शक्ती प्राप्त करण्याच्या टप्प्यापासून खूप लांब आहे. अशा परिस्थितीत लोकांना व्हायरसच्या संक्रमणापासून वाचण्यासाठी मास्क परिधान करणे आवश्यक आहे. शिवाय फिजीकल डिस्टन्स आणि हातांची स्वच्छता देखील बाळगणे आवश्यक आहे.
भारतात कोरोनाचे रुग्ण गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा वाढलेले दिसून येत आहेत. भारतात गेल्या 24 तासांत कोरोनाचे नवे 15,510 रुग्ण आढळले आहेत. या नव्या रुग्णांसह देशातील एकूण आजवरच्या कोरोना रुग्णांची संख्या ही 1,10,96,731 वर पोहोचली आहे. काल देशात 11,288 रुग्णांना डिस्चार्ज दिला गेला आहे. या नव्या बऱ्या झालेल्या रुग्णांसह देशातील आजवरच्या एकूण बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या ही 1,07,86,457 वर पोहोचली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.