नुपूर शर्मा प्रकरणाचे पडसाद; देशात मोठा सायबर हल्ला

एकट्या महाराष्ट्रातल्या ५० हून अधिक सरकारी आणि खासगी साईट्सवर हल्ला झाला आहे.
danger of Cyber attacks on Internet users
danger of Cyber attacks on Internet users Sakal
Updated on

निलंबित भाजपा नेत्या नुपूर शर्माच्या मोहम्मद पैगंबर यांच्याविषयीच्या टिप्पणीमुळे मोठा वाद उफाळून आला आहे. अनेक अरब देशांनीही या प्रकरणी आपला विरोध दर्शवला आहे. भारतातही अनेक राज्यांमध्ये याच्या निषेधार्थ निदर्शनं झाली आहे. दरम्यान भारतात या प्रकरणामध्ये भारतातल्या अनेक वेबसाईट्सवर आंतरराष्ट्रीय सायबर अटॅक झाले आहेत. (Prophet Mohammad Row over Nupur Sharma statement)

danger of Cyber attacks on Internet users
नुपूर शर्मा आणि नवीन कुमार यांची पक्षातून हकालपट्टी, आखाती देशांमध्ये वातावरण तापलं

या हॅकर्सनी भारतातल्या एका प्रमुख बँकेला लक्ष्य करण्याचा प्रयत्नही केला होता. मलेशियातल्या हॅक्टिविस्ट समूह ड्रॅगनफोर्सने केलेल्या या सायबर हल्ल्यांमध्ये ऑनलाइन प्लॅटफॉर्म्ससोबत इस्रायलमधला भारतीय दूतावास, राष्ट्रीय कृषी विस्तार प्रबंधन संस्थान आणि भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या ई-पोर्टलला लक्ष्य केलं आहे. हॅकर्सनी (Cyber Attack in India) साधारण ७० च्या आसपास वेबसाईट्स हॅक केल्या आहेत.

danger of Cyber attacks on Internet users
नुपूर शर्मांविरोधात औरंगाबाद, सोलापुरसह देशभर जोरदार निदर्शने

याशिवाय दिल्ली पब्लिक स्कूल, भवन आणि देशातल्या अनेक मोठ्या समूहांच्या प्रमुख शिक्षण संस्थांवरही हल्ला केला. फक्त महाराष्ट्रातल्या ५० पेक्षा अधिक वेबसाईट्स हॅक करण्यात आल्या आहेत. ऑडिओ क्लिप आणि टेक्स्टच्या माध्यमातून हॅकर्सने एक मेसेज पाठवला आहे. ज्यात त्यांनी सांगितलंय की तुमच्यासाठी तुमचा धर्म आहे आणि माझ्यासाठी माझा धर्म आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या अहवालानुसार, भारत सरकारच्या साईट्ससह काही खासगी पोर्ट्ल्स ८ ते १२ जूनच्या दरम्यान पूर्ववत करण्यात आली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.