Cyber Crime News: वर्क फ्रॉम होम पाहिजे हा हट्ट पडला महागात; झटक्यात गेले ७ लाख

गेल्या काही दिवसांत वेगाने वाढत असलेल्या ऑनलाईन फसवणुकीच्या घटनांमध्ये आणखी एका घटनेची भर पडली आहे.
Cyber Fraud
Cyber FraudSakal
Updated on

वर्क फ्रॉम होम असलेल्या नोकऱ्या अनेकांना हव्या असतात. त्यासाठी प्रयत्नही सुरू असतात. अशाच एका नोकरीपायी एका महिलेने आपल्या खात्यात असलेले ७.९१ लाख रुपये गमावले आहेत. गेल्या काही दिवसांत वेगाने वाढत असलेल्या ऑनलाईन फसवणुकीच्या घटनांमध्ये आणखी एका घटनेची भर पडली आहे.

केरळमधल्या एका महिलेला टेलिग्रामवर एक मेसेज मिळाला. मंदिरा शर्मा नावाच्या महिलेशी या महिलेने चॅटिंग केली. यामध्ये मंदिरा शर्मा सांगते की ratingdsys.com तर्फे बोलत आहे आणि तिच्याकडे महिलेसाठी वर्क फ्रॉम होमची जॉब ऑफर आङे.

Cyber Fraud
Nashik Cyber Crime: ‘वर्क फ्रॉम होम’ च्या नादात गमावले 18 लाख; सायबर गुन्हेगाराकडून महिलेची फसवणूक

पीडित महिलेला सांगण्यात आलं की तिला वेगवेगळ्या वेबसाईट्सला रेटिंग्स आणि रिव्ह्यू देण्याचं काम करावं लागेल. हे काम इक्सिगो लाईव्ह सर्विस या कंपनीसोबत असेल. ही एक प्रसिद्ध कंपनी आहे. फसवणूक करणाऱ्यांना पीडितेला सगळं काम समजावलं आणि सांगितलं की त्यांना दररोज नवं काम दिलं जाईल आणि ते त्यांना पूर्ण करावं लागेल. यानंतर पीडितेला हे काम चांगलं वाटतं आणि तिचा विश्वास बसतो. 

Cyber Fraud
Nashik Cyber Police : दंगली रोखण्यासाठी नाशिक पोलिसांची सोशल मीडियावर 'सायबर गस्त'; वापरणार विशेष सॉफ्टवेअर

त्यानंतर या चोरट्यांनी महिलेला आमिष दाखवलं आणि सांगितलं की तिने काही पैसे गुंतवले तर ते डबल होऊ शकतात. काही काळ काम केल्यानंतर त्या महिलेला यावर विश्वास बसला. याच हव्यासापोटी या महिलेने अनेक व्यवहार केले आणि त्यामध्ये एकूण ७ लाख ९१ हजार रुपये गमावले. या सायबर चोरट्यांनी या महिलेचा विश्वास जिंकण्यासाठी सुरुवातीला १७००० रुपये तिच्या खात्यावर जमा केले. पण ज्यावेळी या महिलेला वेबसाईट एक्सेस करता येणं बंद झालं, तेव्हा तिला लक्षात आलं की तिची फसवणूक झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()