कोरोनानंतर वर्क फ्रॉम होमचं प्रमाण वाढलं आहे. त्यानंतर इंटरनेट वापरणाऱ्यांचं प्रमाणही वाढलं आहे. मात्र याचाच फायदा सायबर गुन्हेगार घेताना दिसत आहेत. असंच एक ताजं उदाहरण गुरुग्राम इथून समोर आलं आहे. एक युट्यूब चॅनेल सबस्र्काईब केल्याने महिलेचे झटक्यात ८ लाख रुपये गेल्याचं आढळून आलं आहे.
मूळच्या कर्नाटकच्या असलेल्या सरिता एस सध्या गुरुग्रामच्या सेक्टर ४३ मध्ये राहते. तिला वर्क फ्रॉम होमच्या बहाण्याने आठ लाखांचा गंडा घालण्यात आला आहे. या महिलेने तात्काळ पोलिसांत तक्रार दिली आहे. या तक्रारीत या महिलेने आपल्यासोबत काय झालं, याबद्दल सविस्तर लिहिलं आहे.
सरिता यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं आहे की, त्यांना व्हॉटसपवर एक मेसेज आला होता. या मेसेजमध्ये घरून काम करून पैसे कमवता येणार असं लिहिलं होतं. त्या मेसेजमध्ये असंही लिहिलं होतं की, सुरुवातीला तुम्हाला एका युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करावं लागेल आणि त्यासाठी ५० रुपये भरावे लागतील. मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीने आपली ओळख ऐडनेट ग्लोबल मार्केटिंग कंपनीचा एच आर अशी करून दिली होती.
सरिता यांनी पुढे सांगितलं की, मी दोन चॅनेल्सला सबस्क्राईब केलं आणि त्यानंतर मला लैला नावाच्या एका मुलीचा फोन आला. तिने माझ्याकडे माझं इन्स्टाग्रामचं आयडी मागितलं. मी तिला टेलिग्रामवर मेसेज केला, तेव्हा तिने मला आणखी काही चॅनेल्सचं सबस्क्रिप्शन घ्यायला सांगितलं आणि १५० रुपये भरायला लावले. त्यानंतर मी एका टेलिग्राम गृपमध्ये घेण्यात आलं. तिथे १८० सदस्य होते, ते सगळे हेच काम करत होते. (Cyber Crime News)
लैलाने सरिताला सांगितलं की जर तिने हे काम पूर्ण केलं तर तिला फायदा होईल. अशाच सगळ्या कामांमधून आपली ८ लाख रुपयांना फसवणूक झाल्याचं सरिता यांनी तक्रारीत म्हटलं आहे. त्यानंतर सरिता यांनी तात्काळ पोलिसांत धाव घेतली आणि आपली तक्रारी दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केले आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.