Cyclone Biparjoy: वादळासोबत भूकंपही का येतो? जाणून घ्या कारण

बुधवारी सायंकाळी कच्छमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले.
Cyclone Biparjoy
Cyclone Biparjoyesakal
Updated on

Cyclone Biparjoy : अरबी समुद्रात बिपरजॉय या चक्रीवादळाने भीषण रूप धारण केलं आहे. 15 जून रोजी बिपरजॉय गुजरातच्या कच्छ आणि पाकिस्तानच्या किनारी भागात लँडफॉल करणार आहे. त्यामुळे गुजरातच्या किनारी भागात मोठा विध्वंस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागातील लोक भीतीच्या छायेत जगत आहेत. बुधवारी सायंकाळी कच्छमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. संध्याकाळी 5.05 मिनिटांनी झालेल्या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.5 इतकी असली तरी त्यामुळे येथील लोक अधिकच घाबरले.

याआधी संध्याकाळी 4.15 वाजता जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. याच्या एक दिवस आधी मंगळवारी दुपारी दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. त्याचा परिणाम जम्मू-काश्मीर, चंदीगडसह अनेक शहरांमध्ये दिसून आला. अशा स्थितीत प्रश्न पडतो की वादळ आले की भूकंप का येतो? असं का होतं ? भूकंप आणि वादळाचा काय संबंध आहे?

हवामान बदलामुळे मोठे बदल होत आहेत

ज्या प्रकारे हवामान बदलत आहे आणि भूवैज्ञानिक क्रियाकलापांमध्ये बदल दिसून येत आहेत त्यामुळे ही वादळे आणि भूकंप एकत्र येत आहेत. भारतीय उपखंडातील महासागर सतत गरम होत आहेत. त्यामुळे अरबी समुद्रात चक्रीवादळांची संख्या वाढत असून ते अधिक प्राणघातक होत आहेत. नुकतेच न्यूझीलंडमध्ये वादळामुळे पूर आला होता आणि त्यानंतर भूकंपाचे धक्के पाहायला मिळाले. तेव्हापासून, संशोधक हलक्या भूकंपाच्या क्षेत्राचे हवामान आणि भूकंपीय क्रियाकलाप यांचा काही संबंध असू शकतो का याचा अभ्यास करत आहेत. या अभ्यासात असे आढळून आले की हे शक्य आहे.

Cyclone Biparjoy
Cyclone Biparjoy: एकीकडे बिपरजॉय चक्रीवादळ तर दुसरीकडे भूकंपाचे धक्के, गुजरातमध्ये IMDकडून ‘रेड अलर्ट’

वादळ आणि भूकंप यांचा काय संबंध?

2010 साली हैती आणि तैवानमध्ये जे भूकंप झाले, तेव्हाही भूकंप झाल्याचं एका अभ्यासात समोर आलं होतं. तेथे आदळणाऱ्या वादळांचे परिणाम असू शकतात. मियामीच्या रोसेन्स्टिल स्कूल ऑफ मरीन अँड अॅटमॉस्फेरिक सायन्स विद्यापीठातील सागरी भूगर्भशास्त्र आणि भूभौतिकशास्त्राचे सहयोगी संशोधन प्राध्यापक सेमियन वाडोविन्स्की यांच्या नेतृत्वाखाली हा अभ्यास करण्यात आला. त्यात त्यांनी पाऊस हा भूकंपाचा ट्रिगर पॉइंट असल्याचे सांगितले होते.

Cyclone Biparjoy
Cyclone In India: या 5 वादळांमुळे हजारो लोकांचा बळी गेला होता

भूकंप का होतात?

भूकंप होण्याचे मुख्य कारण म्हणजे पृथ्वीच्या आतील प्लेट्सची टक्कर. पृथ्वीच्या आत सात प्लेट्स आहेत. या प्लेट्स सतत फिरत राहतात. अशा परिस्थितीत जेव्हा प्लेट्स एखाद्या ठिकाणी एकमेकांवर आदळतात तेव्हा भूकंपाचे धक्के जाणवतात. कारण प्लेट्सच्या टक्करमुळे फॉल्ट लाइन झोन तयार होतो. यामुळे, पृष्ठभाग वाकतो आणि दाब तयार होतो, ज्यामुळे प्लेट्स तुटू लागतात. त्यामुळे पृथ्वी हादरते आणि या संपूर्ण प्रक्रियेला भूकंप म्हणतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.