Cyclone Biparjoy : बिपरजॉय चक्रीवादळाचा गुजरातला बसू शकतो तडाखा; IMD चा इशारा काय?

Cyclone Biporjoy
Cyclone Biporjoyesakal
Updated on

Biporjoy Cyclone News : बिपरजॉय चक्रीवादळ उग्र रुप धारण करण्याचा धोका संभवत आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार १५ जूनच्या आसपास हे चक्रीवादळ उत्तरेकडे सरकण्याची शक्यता आहे. गुजरातच्या किनारपट्टीला या वादळाचा तडाखा बसू शकतो.

IMDच्या ताज्या माहितीनुसार, पूर्व-मध्य अरबी समुद्रावरील 'बिपरजॉय' 15 जून रोजी दुपारच्या सुमारास गुजरातमधील सौराष्ट्र-कच्छ आणि लगतच्या पाकिस्तानच्या किनार्‍या ओलांडून जाईल.

Cyclone Biporjoy
Ashadhi Wari 2023: वारकऱ्यांवर झालेल्या लाठीमाराची घटना क्लेशदायक, सरकारचा निषेध! अजित पवार भडकले

महाराष्ट्रालाही बिपरजॉय चक्रीवादळाचा फटका बसत आहे. कोकण किनारपट्टीवर ‘बिपरजॉय’ चक्रीवादळाचे पडसाद दिसू लागले आहेत. सोसाट्याचा वारा, उधाणातून बचावासाठी जिल्हा प्रशासनाकडून किनारपट्टीलगतच्‍या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

शुक्रवारी दुपारपासूनच समुद्रातील वाऱ्याचा वेग वाढू लागला आहे. समुद्रात उंच-उंच लाटा उसळू लागल्या आहेत. अरबी समुद्रात ‘बिपरजॉय’ नावाच्या चक्रीवादळाचे संकेत असून ही चक्रीय स्थिती जूनपर्यंत राहणार असल्‍याने यादरम्‍यान समुद्र खवळलेला असेल.

Cyclone Biporjoy
Ashadhi Wari 2023 : आळंदीत लाठीमार झालेला नाही, तर किरकोळ झटापट; पोलिस आयुक्तांचा दावा

भारतीय हवामानशास्त्र विभागाने सांगितले की, बिपरजॉय चक्रीवादळ काही तासांत तीव्र होण्याची शक्यता आहे, गुजरातचा धोका आता कमी झाल्याचं सांगण्यात येतंय. हे चक्रीवादळ पोरबंदर किनार्‍यापासून 200-300 किमी अंतरावर जाण्याची शक्यता आहे. परंतु येत्या पाच दिवसांत पश्चिमी भागात गडगडाट आणि जोरदार वारे वाहतील. त्यामुळे १५ तारखेपर्यंत बिपरजॉयच्या हालचालींकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.