Cyclone Midhili: बंगालच्या उपसागरात आले मिधिली चक्रीवादळ; सतर्कतेचा इशारा

Cyclone Midhili: बंगालच्या उपसागरात आले  मिधिली चक्रीवादळ; सतर्कतेचा इशारा
Updated on

Cyclone Midhili: बंगालच्या उपसागरातील तीव्र कमी दाबाच्या क्षेत्राचे ‘मिधिली’ या चक्रीवादळात रूपांतर झाले. हे चक्रीवादळ सुंदरबनवरून पुढे सरकून प्रतितास ८० कि.मी.वेगाने बांगलादेशच्या किनाऱ्याला धडकण्याची शक्यता आहे, अशी माहिती हवामान खात्याने दिली. मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशाराही देण्यात आला आहे.


उत्तर बंगालच्या उपसागरावरील तीव्र कमी दाबाच्या क्षेत्राचे मिधिली चक्रीवादळात रूपांतर होऊन ते उत्तर-ईशान्य दिशेने सरकत आहे. ते आज सकाळी प.बंगालमधील दिघापासून २०० कि.मी.वर तर बांगलादेशातील खेपुपारापासून २२० कि.मी.वर होते.

Cyclone Midhili: बंगालच्या उपसागरात आले  मिधिली चक्रीवादळ; सतर्कतेचा इशारा
Hamoon Cyclone : हामून चक्रीवादळाची तीव्रता वाढली, सात राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा

‘मिधिली’ चक्रीवादळ खेपुपाराजवळ आज रात्री किंवा उद्या (ता. १८) सकाळी बांगलादेशची किनारपट्टी ओलांडण्याची शक्यता आहे. यावेळी वाऱ्याचा वेग प्रतितास ६० ते ७० कि.मी. राहू शकतो. तसेच तो ८० कि.मी. प्रतितासपर्यंत पोचू शकतो.

मात्र, मिधिली चक्रीवादळ ओडिशाच्या किनाऱ्यापासून १५० कि.मीवरून जाणार असल्याने राज्यात फारसा परिणाम जाणवणार नाही. मात्र, ओडिशातील केंद्रपाडा आणि जगतसिंहपूर या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे, असे हवामानतज्ज्ञ उमाशंकर दास यांनी सांगितले. ओडिशाप्रमाणेच प. बंगालच्या किनारी जिल्ह्यांतही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Cyclone Midhili: बंगालच्या उपसागरात आले  मिधिली चक्रीवादळ; सतर्कतेचा इशारा
Cyclone Tej : पुढील 24 तासांत धोकादायक रूप धारण करू शकते चक्रीवादळ 'तेज', IMDचा इशारा

अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात निर्माण होणाऱ्या चक्रीवादळांचा सामना करावा लागणाऱ्या देशांकडून क्रमाने त्यांचे नामकरण केले जाते. त्यानुसार, मालदीवने या चक्रीवादळाला ‘मिधिली’ असे नाव दिले आहे.

ईशान्येत मुसळधार पावसाची शक्यता
‘मिधिली’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे मिझोराम, त्रिपुरा, नागालॅंड, मणिपूर, आसाम आणि मेघालय या राज्यांतही मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. बांगलादेशच्या दिशेने येणारे हे यंदाच्या हंगामातील दुसरे चक्रीवादळ आहे. यापूर्वी ‘हामून’ चक्रीवादळही बांगलादेशला धडकले होते.

Cyclone Midhili: बंगालच्या उपसागरात आले  मिधिली चक्रीवादळ; सतर्कतेचा इशारा
Cyclone Tej : मुंबईवर घोंगावतंय 'तेज' चक्रीवादळाचे संकट, कधी धडकणार? शहराला कितपत धोका?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()