Sukhoi 30 MKI:भारतीय वायुसेनेच्या हवाई ताकदीत आणखी वाढ होणार आहे. भारताची हवाई सुरक्षा लक्षात घेता संरक्षण विभागाने १२ सुखोई ३० एमकेआय ही लढाऊ विमानं देशात तयार करण्यासाठी . ही सर्व विमाने 'मेक इन इंडिया' प्रोजेक्ट अंतर्गत हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडद्वारे (HAL) तयार केली जातील. संरक्षण अधिकार्यांनी सांगितले की, ४५,००० कोटी रुपयांच्या या प्रकल्पात विमानं आणि संबंधित ग्राउंड सिस्टमचा समावेश असेल.
हे विमान भारतातच बनवले जाणार आहेत, जे देशात तयार होणाऱ्या लढाऊ विमानांच्या दृष्टीने एक मोठं पाऊल असेल. विमानात आवश्यकतेनुसार साहित्याचा समावेश असेल. सुखोई 30 MKI लढाऊ विमाने गेल्या अनेक वर्षांत अपघातांचे बळी ठरलेल्या 12 विमानांची जागा घेतील. हे एक मल्टीरोल लढाऊ विमान आहे. ज्यामध्ये एकाच वेळी हवेतून जमिनीवर आणि हवेतून हवेत युद्ध लढण्याची क्षमता आहे.
संरक्षणमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली हा निर्णय घेण्यात आला
DAC ने अंदाजे 45,000 कोटी रुपयांची तरतूद या १२ विमानांसाठी केली आहे. एएनआयच्या वृत्तानुसार, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली 15 सप्टेंबर रोजी ही बैठक झाली. संरक्षण मंत्रालयाने सांगितलं की या सर्व खरेदी भारतीय विक्रेत्यांकडून प्रोक्योरमेंट (इंडियन-इंडिजिनसली डिझाईन आणि मॅन्युफॅक्चर्ड (IDMM)/प्रोक्योरमेंट (भारतीय) श्रेणी अंतर्गत केल्या जातील, जे 'आत्मनिर्भर भारत'चे ध्येय साध्य करण्यासाठी भारतीय संरक्षण क्षेत्राला योगदान देईल. यामुळे उद्योगाला भरीव चालना मिळेल.(Latest Marathi news)
क्षमता वाढेल
मंत्रालयाने सांगितले की, DAC ने भारतीय नौदलासाठी पुढील पिढीच्या सर्वेक्षण जहाजांच्या खरेदीला देखील मान्यता दिली आहे, ज्यामुळे हायड्रोग्राफिक ऑपरेशन्स आयोजित करण्यात त्यांची क्षमता वाढेल. DAC ने भारतीय वायुसेनेच्या प्रस्तावांसाठी AON ला देखील मान्यता दिली ज्यामध्ये ऑपरेशनल अचूकता आणि विश्वासार्हता सुधारण्यासाठी डॉर्नियर विमानाचे एव्हियोनिक अपग्रेड समाविष्ट आहे. (Latest Marathi news)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.