sakal Podcast : इस्रोचे मिशन आदित्य ते नवाब मलिक कोणाच्या गोटात?

सकाळ पॉडकास्टमध्ये रोज ऐका देशविदेशातील आठ महत्त्वाच्या घडामोडी
sakal Podcast
sakal PodcastE sakal
Updated on

सकाळ पॉडकास्ट आत ऐकता येईल, सकाळ अॅप आणि इतर अनेक ऑडिओ प्लॅटफॉर्म्सवर.

आज काय ऐकाल?

इस्रोचे मिशन चांद्रयान-३ आता अगदी शेवटच्या टप्प्यात आहे. आता इस्रोने मिशन आदित्यची घोषणा केली आहे. मंगळयान, चांद्रयान आणि आता मिशन आदित्य अशी ही वाटचाल आपल्या साऱ्यांसाठीच अत्यंत अभिमानाची आहे. त्याविषयी ऐकणार आहोत आजच्या पहिल्या बातमीत. खोट्या बातमीच्या कचाट्यातून कुणीच सुटलेलं नाही अगदी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश चंद्रचूडसुद्धा. त्यांच्या नावाने फिरणारी खोटी बातमी काय आहे, त्याविषयी ऐकूया. निवडणुका जवळ येत चालल्याने राजकीय पक्षांतील घडामोडींनाही अगदी बहर आलाय. शिवसेनेतील शिंदे गटाचे जवळपास ४०० पदाधिकारी राजीनाम्याच्या तयारीत असल्याचं कळतंय.

वेगवान घडामोडींत ऐकूया, होमगार्ड जवानांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पाच पदके जाहीर झाली आहेत. मेलबर्नमध्ये शबाना आझमींनी तिरंगा फडकावला आहे. ट्विटरच्या डीपीवर तिरंगा लावताना एक मह्त्तवाचा नियम माहितेय का? वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी घेण्यात येणारी नीट परीक्षा अनुत्तीर्ण झाल्याने तामिळनाडूत वडील आणि मुलाने आत्महत्या केली आहे. त्यामुळे एकूणच विद्यार्थ्यांवरील ताणाचा विषय चर्चेत आहे.

चर्चेतल्या बातमीत ऐकू नवाब मलिक कोणत्या गटात जाणार, याविषयी.

१. आता इस्रोचे मिशन आदित्य

२. चक्क सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांच्या नावे फेक व्हॉट्सअप मेसेज

३. शिवसेना शिंदे गटातील ४०० पदाधिकारी राजीनाम्याच्या तयारीत

४. महाराष्ट्रातील होमगार्ड जवानांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पाच पदके जाहीर

५. ट्विटरच्या डीपीवर तिरंगा लावताय? जाणून घ्या 'हा' नियम,

६. मेलबर्न मध्ये शबाना आझमी यांनी फडकावला तिरंगा

७. NEET परीक्षेपायी वडील आणि मुलाची आत्महत्या

८. नवाब मलिक कुणाच्या गोटात? थोरल्या की धाकल्या पवारांच्या?

........

स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित, निलम पवार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.