दररोज सकाळ पॉडकास्टमध्ये देशविदेशातील ८ महत्त्वाच्या घडामोडींची दखल घेतली जाते. सकाळच्या अॅपवर तसेच इतरही ऑडिओ प्लॅटफॉर्म्सवर तुम्ही हे पॉडकास्ट ऐकू शकता.
आज सकाळ पॉडकास्टमध्ये काय ऐकाल?
बीडमधील सभेत शरद पवार गटातील नेत्यांनी मोदी आणि फडणवीसांवर थेट टीका केली. मणिपूर, जातीय हिंसाचार, मनुवाद असे अनेक मुद्दे यावेळी व्यासपीठावरुन घेतले गेले. दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयाने गुजरात सरकारला काही परखड सवाल केले आहेत आणि बिल्किस बानो केसमधल्या दोषींच्या सुटकेविषयी तपशील सादर करण्यास सांगितले आहे. बजरंग पुनिया आपला सराव सोडून भारतात परतला आहे त्याला कारण आहेत कुस्ती महासंघाच्या निवडणुका.
वेगवान बातम्यांत ऐकूया, सरकारमध्ये सामील झाल्यानंतर आता हसन मुश्रीफांना मनी लाँडरिंग केसमध्ये न्यायालयाने दिलासा दिल्याचं कळतं. राहुल गांधींच्या आडनावावरुन शरद पोंक्षेंनी जहरी टीका केलीय. जागतिक तिरंदाजी स्पर्धेत भारतीय संघाने उत्तम कामगिरी केलीय. तर चांद्रयान ३ मोहिमेतील एक महत्त्वाचा टप्पा यशस्वीपणे पार पडला आहे.
चर्चेतल्या बातमीत ऐकू भरत गोगावले यांच्या मंत्रिपदाविषयीच्या विधानाबद्दल...
.......................................…
१. बीडच्या सभेत राष्ट्रवादी शरद पवार गटाचा हल्लाबोल, मोदी आणि फडणवीसांवर थेट टीका
२. केवळ बिल्किस बानो खटल्यातील दोषींनाच रिलीज पॉलिसीचा फायदा का? सर्वोच्च न्यायालयाचा गुजरात सरकारला सवाल
३. सराव सोडून बजरंग पुनिया भारतात परतला कारण...
४. हसन मुश्रीफांना न्यायालयाचा दिलासा
५. राहुल गांधींच्या आडनावावरुन शरद पोंक्षेंची जहरी टीका
६. जागतिक तिरंदाजी स्पर्धेत भारतीय तिरंदाजांची आगेकूच
७. 'चांद्रयान-3' मधील प्रॉपल्शन-लँडर मॉड्यूल झाले वेगळे; मोहिमेतील महत्त्वाचा टप्पा यशस्वी
८. “आमच्या जीवावर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झालेत”, शिंदे गटाच्या आमदाराचे वक्तव्य
........
स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.