Tamilnadu Temple:नव्या बदलास झाली सुरवात ! तब्बल १०० वर्षांनंतर दलितांना मिळाला मंदिरात प्रवेश

Dalit Entry in Temple:तमिळनाडूच्या तिरुवन्नामलाई जिल्ह्यातील चेल्लकुप्पम गावातील मरियम्मन मंदिरात दलितांना १०० वर्षांनंतर प्रवेश मिळाला आहे.
Tamilnadu Temple:नव्या बदलास झाली सुरवात ! तब्बल १०० वर्षांनंतर दलितांना मिळाला मंदिरात प्रवेश
Updated on

Tamilnadu Dalit Entry in Temple after 100 Year:तमिळनाडूच्या तिरुवन्नामलाई जिल्ह्यातील चेल्लकुप्पम गावातील मरियम्मन मंदिरात दलितांना १०० वर्षांनंतर प्रवेश मिळाला आहे. दलितांच्या समुहाने जेव्हा मंदिराच्या परिसरात प्रवेश केला, तेव्हा पोलिसांच्या तुकडीने त्यांना संरक्षण दिले होते.

सर्व घटनाक्रम शांततापूर्ण वातावरणात पार पडला. पोलिसांनी सांगितले की, दुसऱ्या समुदायाच्या लोकांकडून अद्याप कोणताही विरोध नोंदवलेला नाहीये. सध्या गावामध्ये पोलीसांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे.

यावर्षी जुलै महिन्यात मंदिरात प्रवेश मिळाना यासाठी तरुणांनी आंदोलन केलं होतं. यादरम्यान दलित समुदायाचे वन्नियारांसोबत भांडणं झाले. दलित आणि वन्नियार समुदायाच्या तरुणांनी गावातील एकाच शाळेत शिक्षण घेतले होते आणि नंतर नोकरीसाठी चेन्नईला निघून गेले.

त्यांनी सर्वात आधी समाज माध्यमांवर दलितांना मंदिरात प्रवेश मिळावा यासाठी वादविवाद केलेला बघायला मिळाला.जेव्हा त्यांनी गावात येऊन लोकांशी बोलण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याचं रुपांतर हाणामारीमध्ये झालं.(Latest Marathi News)

Tamilnadu Temple:नव्या बदलास झाली सुरवात ! तब्बल १०० वर्षांनंतर दलितांना मिळाला मंदिरात प्रवेश
Haryana Violence: हरियाणा हिंसाचाराची धग राजधानीत; बजरंग दल, VHP कडून दिल्ली-फरीदाबाद हायवे ब्लॉक

या भांडणानंतर दलितांनी जिल्हा प्रशासन आणि पोलीस अधिकाऱ्यांकडे याचिका केली, ज्यात त्यांनी मंदिरात प्रवेश मिळण्याची मागणी केली होती. वेल्लोर रेंजच्या डीआयजी एमएस मुथुसामी यांच्या नेतृत्वाखाली गावात मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा ठेवण्यात आला आहे.

माध्यमांच्या अहवालानुसार, एका ५० वर्षाच्या महिलने सांगितले की, "एक दृढ विश्वास आहे की आपल्या मनातील इच्छा पुर्ण व्हावी यासाठी नवविवाहित लोक मंदिरात प्रार्थना करतात आणि पोंगल बनवतात.मात्र, आम्हाला कधीही मंदिरात प्रवेश करु दिला गेला नाही. आम्ही आज खुष आहोत की जिल्हा अधिकाऱ्यांनी आम्हाला मंदिरात प्रवेश करण्याचा, प्रार्थना करण्याचा, पोंगल बनवण्यात आणि आमच्या इच्छा पूर्ण करण्यात मदत केली." (Latest Marathi News )

Tamilnadu Temple:नव्या बदलास झाली सुरवात ! तब्बल १०० वर्षांनंतर दलितांना मिळाला मंदिरात प्रवेश
Devendra Fadanvis:फडणवीसांची मोठी घोषणा; लव-जिहादवर बनवणार कायदा, पोलिसांना दिले 'हे' आदेश

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.