Renukaswamy Murder Case: "गरीब असो की श्रीमंत, पौष्टिक आहार मिळणे हा कैद्यांचा हक्क", चाहत्याची हत्या करणाऱ्या अभिनेत्याला दिलासा

Darshan Tugudeep: दर्शन आणि त्याची मैत्रीण पवित्रा गौडा यांना बेंगळुरूमधील मेडिकल स्टोअरमध्ये काम करणाऱ्या रेणुकास्वामी या तरुणाच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली होती.
Darshan Thoogudeepa And Pavithra Gowda
Darshan Thoogudeepa And Pavithra GowdaEsakal
Updated on

कर्नाटक उच्च न्यायालयाने एका प्रकरणाची सुनावणी करताना सांगितले की, "पौष्टिक आहार हा सर्व नागरिकांचा आणि कैद्यांचा हक्क आहे. त्यामुळे कैद्यांच्या सामाजिक आणि आर्थिक स्थितीच्या आधारावर कोणताही भेदभाव केला जाऊ नये."

रेणुकास्वामी हत्येप्रकरणी तुरुंगात असलेला कन्नड अभिनेता दर्शन थुगुदीपा याच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती एम नागप्रसन्ना यांनी ही टिप्पणी केली.

दर्शनने न्यायदंडाधिकारी न्यायालयाच्या आदेशाला आव्हान दिले होते, ज्यामध्ये तुरुंगात घरचे अन्न, अंथरून आणि कटलरीची विनंती फेटाळली होती.

दर्शन थुगुदीपाचे न्यायलयात ज्येष्ठ वकील प्रभुलिंग के नवदगी यांनी प्रतिनिधित्व केले. युक्तिवाद करताना ते म्हणाले की, "अभिनेत्याला वैद्यकीय प्रमाणपत्रानुसार पौष्टिक आहाराची आवश्यकता आहे."

ज्यावर न्यायमूर्ती नागप्रसन्ना म्हणाले, "जर त्याला आरोग्याच्या समस्यांमुळे विशेष आहाराची आवश्यकता असेल, तर डॉक्टर तो देतील. हे केवळ अभिनेता दर्शनशी संबंधित नाही तर प्रत्येक नागरिकाला किंवा अंडरट्रायल कैद्याला पौष्टिक आहार मिळण्याचा अधिकार आहे, मग त्याची परिस्थिती कशीही असली तरी भेदभाव केला जाऊ शकत नाही."

Darshan Thoogudeepa And Pavithra Gowda
Water Leakage in New Parliament: नव्या संसद इमारतीची काय ही अवस्था! वर्ष झाला नाही तोच लागली गळती; व्हिडिओ पाहाच

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एका रेणुकास्वामी नावाच्या चाहत्याने अभनेत्री पवित्रा गौडा यांना अश्लील मेसेज पाठवले होते, ज्यामुळे अभिनेता दर्शनला राग आला होता. याच रागातून दर्शनने रेणुकास्वामीची हत्या केल्याचा आरोप आहे.

रेणुकास्वामी याचा मृतदेह ९ जून रोजी सुमनहल्ली येथील एका अपार्टमेंटच्या शेजारी असलेल्या नाल्याजवळ सापडला होता.

यानंतर दर्शन आणि त्याची मैत्रीण पवित्रा गौडा यांना बेंगळुरूमधील मेडिकल स्टोअरमध्ये काम करणाऱ्या रेणुकास्वामी या तरुणाच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली होती.

Darshan Thoogudeepa And Pavithra Gowda
LPG Cylinder Price: ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या दिवशीच महागाईचा झटका! एलपीजी सिलिंडर महागले, दिल्ली ते मुंबईचे नवे दर काय आहेत?

कोण आहे दर्शन थुगदीपा?

कन्नड चित्रपटसृष्टीत मोठे नाव असलेल्या दर्शन थुगुदीपा आघाडीचा अभिनेता आहे. तो सँडलवूड या टोपननावानेही आळखला जातो. 16 फेब्रुवारी 1977 रोजी जन्मलेला दर्शन प्रसिद्ध कन्नड अभिनेता थुगुदीपा श्रीनिवास यांचा मुलगा आहे. दर्शनने त्याच्या प्रभावी आणि अष्टपैलू अभिनयाने प्रक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे.

दर्शनने 2001 मध्ये मॅजेस्टिक चित्रपटाद्वारे कन्नड चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. हा चित्रपट खूप गाजला होता. ज्यामुळे त्याला मोठी लोकप्रियता मिळाली होती.

दर्शनने आतापर्यंत आपल्या कारकिर्दीत कारिया, नम्मा प्रीथिया रामू, गजा, चॅलेंजिंग स्टार, सारथी, क्रांती वीरा सांगोली रायण्णा (2012), बुलबुल आणि यजमान यासारखे यशस्वी चित्रपट दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.