कानपूरः आज देशात इतरत्र रावण दहन केलं जातं. मात्र उत्तर प्रदेशात असं एक ठिकाण आहे जिथं चक्क रावणाची पूजा केली जाते. आजच्या दसऱ्याच्या मुहूर्तावरच हे मंदिर उघडलं जातं. काय आहे ही अनोखी प्रथा ते पाहूया...
उत्तर प्रदेशातल्या कानपूरमध्ये रावणाचं एक मंदिर आहे. हे मंदिर वर्षभर बंद ठेवलं जातं. केवळ आजच्याच दिवशी मंदिर उघडून रावणाच्या मूर्तीचा दुधाने अभिषेक केला जतो. शिवाय पूजाअर्जा करुन साज करण्यात येतो. विशेष म्हणजे फक्त काही तासांसाठी हे मंदिर उघडण्यात येतं.
कानपूर येथील हे रावणाचं मंदिर आज उघडण्यात आलं तेव्हा भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. या मंदिरातील एका पुजाऱ्याने सांगितलं की, रावणाच्या नाभीमध्ये बाण लागल्यानंतर ते धारातीर्थी पडेपर्यंतच्या मधल्या काळात काळचक्राची जी रचना झाली त्यामुळे रावण पूजनीय झाला.
पुजाऱ्याने पुढे सांगितलं की, प्रभू रामाने लक्ष्मणाला रावणाच्या पायाजवळ उभं राहून ज्ञान ग्रहण करण्यास सांगितलं. कारण धरतीवर रावणाइतका ज्ञानी जन्माला आला नव्हता आणि होणारही नव्हता. रावणाचं हेच स्वरुप पूजनीय आहे. याच स्वरुपावरुन रावणाची पूजा करण्याची प्रथा आहे.
कानपूरमधल्या ज्या मंदिरामध्ये रावणाची पूजा होती. ते मंदिर 1868 साली बांधण्यात आलेलं. दरवर्षी लोक हे मंदिर उघडण्याची वाट बघत असतात. रावणाच्या विधीवत पूजेनंतर आरतीदेखील केली जाते. येथे नवस पूर्ण होतो, अशीही भाविकांची भावना आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.