Dasara Festival : रावणाच्या पुतळ्याचे अर्धवट दहन

परंपरेला छेद : छत्तीसगडमधील एक कर्मचारी निलंबित ; चौघांना नोटीस
Dasara Festival tradition Ravan burning Partial Chhattisgarh
Dasara Festival tradition Ravan burning Partial Chhattisgarh
Updated on

धमतरी (छत्तीसगड) : दसऱ्यादिवशी रावणाच्या पुतळ्याचे दहन करण्याची परंपरा अनेक ठिकाणी आहे. मात्र, दशानन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रावणाच्या पुतळ्याचे धड जळाले परंतु दहाही डोकी शाबूत राहिली. रावणाच्या पुतळ्याचे हे अर्धवट दहन चांगलेच महागात पडले. एका कर्मचाऱ्याला निलंबित व्हावे लागले तर आणखी तीन अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. छत्तीसगडमधील धमतरीमध्ये हा प्रकार घडला. कारवाई होणारे चौघेही धमतरी नगरपालिकेचे कर्मचारी आहेत.

दसरा किंवा विजयादशमीने नवरात्रोत्सवाची उत्साहात सांगता होते. चांगल्याच्या वाईटावर विजयाचे प्रतीक म्हणून देशभरात रावणाच्या पुतळ्याचे दहन केले जाते. रामलीला मैदानावर दसऱ्यादिवशी रावणाच्या पुतळ्याचे दहन करण्याच्या कार्यक्रमाचे धमतरी नगरपालिकेकडून आयोजन करण्यात आले होते. यात पुतळ्याचे धड जळाले पण रावणाची दहाही डोकी शाबूत राहिल्याच्या छायाचित्रांमुळे नगरपालिकेची चांगलीच पंचाईत झाली. पुतळा योग्य पद्धतीने न बनविल्याने पुतळ्याची डोकी जळाली नसल्याचा दावा नगरपालिकेच्या अन्य अधिकाऱ्यांनी केला.

अखेर नगरपालिकेने संबंधित कर्मचारी, अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला. नगरपालिकेचे कार्यकारी अभियंता राजेश पदमवार म्हणाले, की रावणाचा पुतळा बनविताना निष्काळजीपणा दाखविल्याबद्दल लिपिक राजेंद्र यादव यांना निलंबित करण्यात आले. त्याचप्रमाणे, इतर तीन अधिकाऱ्यांनाही कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. यात सहाय्यक अभियंता विजय मेहरा, उपअभियंते लोमास देवांगन, कमलेश ठाकूर आणि कामता नागेंद्र यांचा समावेश आहे, असेही त्यांनी नमूद केले. धमतरी नगरपालिकेचे आयुक्त विनयकुमार रजेवर असल्याने सध्या पदमवार हे नगरपालिकेचा कार्यभार सांभाळत आहेत.

नगरपालिकेच्या यासंदर्भातील आदेशात म्हटले आहे, की सहाय्यक श्रेणी ३ मध्ये समावेश असलेले लिपिक यादव यांनी दसऱ्यासाठी रावणाचा पुतळा बनविताना मोठा निष्काळजीपणा दाखविल्याने नगरपालिकेची प्रतिमा मलिन झाली.

रावणाचा पुतळा बनविण्याची जबाबदारी असणाऱ्यांविरुद्ध ही कारवाई करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, पुतळ्याचे अर्धवट दहन झाल्याने या कामाची देयकेही रोखली आहेत.

-विजय देवांगन, नगराध्यक्ष, धमतरी नगरपालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.