Haryana Violence : नूहमध्ये ४५ दुकाने पाडली; बंदोबस्त कायम; हिंसाचारप्रकरणी दोनशे आरोपी अटकेत

नूह हिंसाचारप्रकरणी कालपर्यंत पोलिसांनी विविध जणांवर १०२ गुन्हे दाखल केले असून आतापर्यंत २०२ आरोपींना अटक
Haryana clases
Haryana clasesesakal
Updated on

नूह : नूह हिंसाचारप्रकरणी कालपर्यंत पोलिसांनी विविध जणांवर १०२ गुन्हे दाखल केले असून आतापर्यंत २०२ आरोपींना अटक केली आहे. तसेच आज दुसऱ्या दिवशीही शहर आणि परिसरातील बेकायदा बांधकामांवर बुलडोझर कारवाई सुरूच राहिली.

अडीच एकर जमीन रिकामी करताना ४५ बेकायदा दुकाने पाडण्यात आली. संवेदनशील भागात बंदोबस्त कायम ठेवला आहे. मेवातच्या नूह येथे ३१ जुलै रोजी जलाभिषेक मिरवणुकीच्या काळात झालेल्या हिंसाचारानंतर जिल्ह्यात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासन आणि पोलिसांकडून प्रयत्न केले जात आहेत.

गेल्या काही दिवसांत कोणतीही अप्रिय घटना घडलेली नाही. मात्र नूह परिसरात हिंसाचाराच्या किरकोळ घटना घडत आहेत. प्रशासनाच्या आवाहनानुसार शुक्रवारी मुस्लिम समुदायातील नागरिकांनी घरातच नमाज पठण केले.

हिंसाचारप्रकरणी आतापर्यंत २०२ जणांना अटक केली असून शंभराहून अधिक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पकडलेले सर्व आरोपी हिंसाचारात सामील असल्याचे निदर्शनास आले आहे. नूह आणि परिसरात इंटरनेट सेवा बंद असून आज दुपारी १२ ते दुपारी तीन वाजेपर्यंत इंटरनेट सुरू केले होते.

शहरातील बेकायदा झोपड्या आणि दुकाने पाडण्याचे काम आजही सुरुच राहिले. वैद्यकीय महाविद्यालयाजवळील १३ ते पंधरा तात्पुरते बेकायदा शेड पाडण्यात आले. ब्रजमंडळच्या धार्मिक मिरवणुकीत उसळलेल्या हिंसाचारात या बेकायदा बांधकामांच्या मालकांचा देखील हात होता, असे पोलिसांचे म्हणणे आहे. नल्हड वैद्यकीय महाविद्यालयासमोर सुमारे अडीच एकर जमिनीवरचे ४५ दुकाने पाडण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.