नवी दिल्ली : ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) च्या तज्ञ समितीने हैदराबादस्थित भारत बायोटेक कंपनीला त्यांच्या इंट्रानेझल व्हॅक्सीन (Intranasal Coronavirus Vaccine) आणि बूस्टर डोसच्या फेज-3 चाचण्यांसाठी परवानगी दिली आहे. DCGI ने भारत बायोटेकला मंजुरीसाठी प्रोटोकॉल सादर करण्यास सांगितले आहे. कोरोना आणि ओमिक्रॉनच्या वाढत्या रूग्णसंख्येत ही एक दिलासादायक बातमी आहे. (Bharat Biotech Vaccine)
DGCI तज्ज्ञ समितीची मंगळवारी महत्त्वाची बैठक पार पडली यात भारत बायोटेकच्या नाकाद्वारे देण्यात नेझल व्हॅक्सिनच्या चाचण्यांना मान्यता देण्यात आली आहे. भारत बायोटेकने इंट्रानेझल लस आणि बूस्टर डोसच्या (Booster Dose Clinical Trial ) क्लिनिकल चाचण्यांसाठी अर्ज केला होता. त्यानंतर आता DCGI ने भारत बायोटेकला मंजुरीसाठी प्रोटोकॉल सादर करण्यास सांगितले आहे. दरम्यान, या लसीच्या चाचण्या वेळेवर पूर्ण झाल्यास भारतात मार्चमध्ये इंट्रानेझल बूस्टर लस मिळू शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. या लसीमुळे कोरोना विरोधात लढण्यास आणखी बळ मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे
भारत बायोटेकने कोविशील्ड आणि कोवॅक्सिन (Covishild & Covaxine) लस घेतलेल्या लोकांना बूस्टर डोस देण्याचा प्रस्ताव डीसीजीआयला दिला असून, तिसऱ्या टप्प्यात 5,000 लोकांवर क्लिनिकल चाचण्या घेतल्या जाणार आहेत. यात 50 टक्के कोव्हशील्ड आणि 50 टक्के कोव्हॅक्सीन घेतलेल्या नागरिकांचा समावेश असणार आहे. दुसरा डोस आणि तिसरा डोस यामध्ये सहा महिन्यांचे अंतर असू शकते, अशी शक्यता सूत्रांकडून विर्तविण्यात येत आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.