'सर्वोच्च’स्थानीही न्याय मिळणार नसेल, तर मग...'; बिल्किस प्रकरणावर DCW प्रमुख बोलल्या

Dcw chief swati maliwa news in Marathi
Dcw chief swati maliwa news in Marathi
Updated on

नवी दिल्ली - २००२ च्या गुजरात दंगलीत सामूहिक बलात्कार करून आपल्या कुटुंबातील सात जणांची हत्या करणाऱ्या बिल्किस बानो यांनी दाखल केलेली पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. यानंतर सर्वोच्च न्यायालयाकडून न्याय न मिळाल्यास लोक कुठे जातील, असा सवाल दिल्ली महिला आयोगाच्या प्रमुख स्वाती मालीवाल यांनी शनिवारी उपस्थित केला. (Dcw chief swati maliwa news in Marathi)

Dcw chief swati maliwa news in Marathi
MVA Morcha : फडणवीसजी Cool Down; तुमचा जळफळाट समजू शकतो म्हणत राष्ट्रवादीनं डिवचलं

सामूहिक बलात्कार प्रकरणातील ११ दोषींची शिक्षा माफ करण्याच्या याचिकेवर गुजरात सरकारने विचार करण्यास सांगावं अशी विनंती करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. बिल्किस बानो यांवर वयाच्या २१ व्या वर्षी सामूहिक बलात्कार झाला होता. तसेच तिचा तीन वर्षांचा मुलगा आणि कुटुंबातील इतर सहा जणांची हत्या झाली होती, पण गुजरात सरकारने सर्व बलात्काऱ्यांना मुक्त केले. या प्रक्रियेनुसार जे न्यायाधीश सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधातील पुनर्विचार याचिकेवर निकाल सुनावतात, त्यांचाच कक्षात याचिकेवर घेतला जातो.

Dcw chief swati maliwa news in Marathi
Amitabh Gupta: अमिताभ गुप्ता यांची एका आठवड्यात दुसऱ्यांदा बदली

न्यायमूर्ती अजय रस्तोगी आणि न्यायमूर्ती विक्रम नाथ यांच्या खंडपीठासमोर १३ डिसेंबर रोजी ही याचिका त्यांच्या चेंबरमध्ये विचारार्थ आली. सर्वोच्च न्यायालयाच्या सहाय्यक निबंधकांनी बानो यांच्या वकील शोभा गुप्ता यांना पाठवलेल्या संदेशात म्हटले की, "सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली ही फेरविचार याचिका १३ डिसेंबर २०२२ रोजी फेटाळण्यात आली आहे, याची माहिती तुम्हाला देण्याचे निर्देश मला देण्यात आले आहेत. दोषींच्या याचिकेवर १३ मे रोजी सुनावण्यात आलेल्या आदेशाची समिक्षा करण्याची विनंती बानो यांच्याकडून करण्यात आली होती.

स्वाती मालीवाल यांनी ट्विट करत म्हटलं की, 'सुप्रीम कोर्टाने बिल्किस बानो यांची याचिका फेटाळली. बिल्किस बानोवर वयाच्या २१ व्या वर्षी सामूहिक बलात्कार झाला. त्यांचा तीन वर्षांचा मुलगा आणि कुटुंबातील इतर सहा जणांची हत्या झाली, पण तरी गुजरात सरकारने सर्व बलात्काऱ्यांना मुक्त केले. जर सर्वोच्च न्यायालयातही न्याय मिळत नसेल तर लोकांनी कुठं जायचं असा प्रश्न मालीवाल यांनी उपस्थित केला.

सर्वोच्च न्यायालयाने गुजरात सरकारला ९ जुलै १९९२ च्या धोरणांतर्गत दोषींची मुदतपूर्व सुटका करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर दोन महिन्यांत विचार करण्यास सांगितले होते. त्यानंतर गुजरात सरकारने १५ ऑगस्ट रोजी सर्व ११ दोषींची सुटका केली होती.

हेही वाचा : काय आहे सलाम किंवा कुर्निसाताचे महत्त्व राजशिष्टाचारांमध्ये

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()