धक्कादायक! जंगलात तब्बल 40 माकडांचे मृतदेह सापडल्याने खळबळ; विषबाधेची शक्यता

एवढ्या मोठ्या प्रमाणात माकडांचे मृतदेह सापडल्याने सर्वत्र खळबळ उडालीय.
Srikakulam Forest Monkey
Srikakulam Forest Monkeyesakal
Updated on
Summary

एवढ्या मोठ्या प्रमाणात माकडांचे मृतदेह सापडल्याने सर्वत्र खळबळ उडालीय.

आंध्र प्रदेशच्या श्रीकाकुलम जिल्ह्यातील (Srikakulam Andhra Pradesh) जंगलात माकडांचे (Monkey) मृतदेह आढळल्याने खळबळ उडालीय. इथं सुमारे 40 ते 45 माकडांचे शव सापडले आहेत.

अहवालानुसार, सिलागम गावातील (Silagam Village) जंगलात 40 माकडांचे शव सापडले आहेत. या माकडांना विषबाधा झाल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय. या घटनेबाबत श्रीकाकुलमचे कासीबुगा वन अधिकारी (Kasibugga Forest) मुरली कृष्णन म्हणाले, जिल्ह्यात अशी कोणतीही घटना आम्ही पाहिली नाही. या माकडांना कुणीतरी ट्रॅक्टरमधून आणून जंगलाच्या (Srikakulam Forest) परिसरात फेकून दिलं आहे. आम्ही येथून सुमारे 40-45 माकडांचे शव जप्त केले आहेत.

Srikakulam Forest Monkey
श्रध्दा असावी तर अशी! ब्रिटनचे नवे पंतप्रधान ऋषी सुनक यांचा गोमातेची पूजा करतानाचा Video तुफान व्हायरल

एवढ्या मोठ्या प्रमाणात माकडांचे मृतदेह सापडल्याने सर्वत्र खळबळ उडालीय. या घटनेनंतर मुरली कृष्णन पुढं म्हणाले, 'या माकडांचं शवविच्छेदन केलं जाईल. त्यानंतर शवविच्छेदन रिपोर्ट 5 दिवसांत येईल. प्राणी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येत आहे. आरोपी कोण आहेत, त्यांना लवकरच पकडलं जाईल. या माकडांचे शव इथं कोणी ठेवलं हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.'

Srikakulam Forest Monkey
UK PM : ऋषी सुनक PM होताच मेहबूबा मुफ्तींचं ट्विट; भाजप चांगलंच भडकलं, म्हणालं.. 'तुम्ही अल्पसंख्याक'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.