Frog Found in Wafers : गुजरातमध्ये वेफर्सच्या पाकिटात आढळले मृत बेडूक! महिलेची प्रशासनाकडे तक्रार

Frog Found in Wafers : जामनगरमधील रहिवासी जस्मिन पटेल यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे.
dead frog found in packet of Wafers in Jamnagar Gujarat  probe ordered marathi news rak94
dead frog found in packet of Wafers in Jamnagar Gujarat probe ordered marathi news rak94
Updated on


जामनगर, ता. १९ (पीटीआय) ः गुजरातमधील एका व्यक्तीने खरेदी केलेल्या वेफर्सच्या पाकिटामध्ये मृत बेडूक आढळला असून याप्रकरणी संबंधित महिलेने जामनगर प्रशासनाकडे तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनंतर प्रशासनाच्या वतीने याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले असून, हा बेडूक कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याचे अन्न सुरक्षा अधिकारी डी.बी. परमार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. त्याचप्रमाणे संबंधित पाकिट जेथून खरेदी करण्यात आले तेथे जाऊन चौकशी करण्यात आल्याचेही परमार यांनी सांगितले.

जामनगरमधील रहिवासी जस्मिन पटेल यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. पटेल यांच्या म्हणण्यानुसार मंगळवारी संध्याकाळी त्यांच्या मुलीने घराजवळील दुकानातून वेफर्सचे पाकिट विकत आणले, ते फोडले असता त्यांच्या मुलीला त्यात मृत बेडूक आढळला, यानंतर त्यांनी त्वरित दुकानदाराकडे आणि संबंधित कंपनीकडे याबाबत तक्रार केल्यानंतर त्यांनी समाधानकारक उत्तरे न दिल्याने पटेल यांनी प्रशासनाकडे याबाबत तक्रार दाखल केली.

dead frog found in packet of Wafers in Jamnagar Gujarat  probe ordered marathi news rak94
Sharddha Kapoor & Rahul Modi : 'दिल रख ले पर नींद तो वापस दे दे यार' ; अखेर श्रद्धाने दिली राहुल बरोबरच्या रिलेशनशिपची कबुली ?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.