नवी दिल्लीः सरकारी कर्मचाऱ्यांची यंदाची होळी आनंदाचा रंग घेऊन येणारी ठरु शकते. कारण सरकार महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ करणार असल्याची माहिती आहे.
केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारक यांच्या महागाई भत्त्यामध्ये केंद्र सरकार चार टक्के वाढ करु शकतं. सरकारच्या या निर्णयाचा लाभ तब्बल एक कोटी केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळेल.
सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणारा महागाई भत्ता ३८ टक्के इतका आहे. ज्यामध्ये चार टक्के वाढ करुन तो ४२ टक्के होऊ शकतो. महागाई भत्ता वाढवण्याचा फॉर्म्युला निश्तिच झाल्याची माहिती आहे.
डिसेंबर २०२२साठी ३१ जानेवारी २०२३ रोजी ग्राहक निर्देशांक जारी करण्यात आलेला आहे. या निर्देशांकानुसार महागाई भत्त्यात ४.२३ टक्के वाढ बसते. वित्त मंत्रालयाकडून यासंबंधी प्रस्ताव तयार करण्याचं काम सुरु असल्याची माहिती आहे.
हा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत ठेवला जाईल. त्याला कॅबिनेटची मंजुरी मिळाल्यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये ४ टक्के वाढ होईल. ही वाढ १ जानेवारी २०२३पासून लागू होऊ शकते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.