Train Accident: एका चुकीने घेतला 13 जणांचा बळी; आंध्र प्रदेशातील रेल्वे अपघाताचं धक्कादायक कारण आलं समोर

जाणून घ्या रेल्वेने काय सांगितले आंध्र अपघातामागील कारण
Train Accident
Train AccidentEsakal
Updated on

आंध्र प्रदेशात काल(रविवारी) संध्याकाळी उशिरा झालेल्या रेल्वे अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला आहे. ईस्ट कोस्ट रेल्वे (ECOR) ने या ट्रेन अपघातामागचे कारण स्पष्ट केले आहे. विशाखापट्टणम-रायगडा पॅसेंजर ट्रेनने सिग्नल ओव्हरशूट केल्याने ही टक्कर झाली असावी. त्यामुळे दोन्ही गाड्या एकमेकांवर आदळल्या, अशी माहिती दिली आहे.

आधी बालासोर, मग बिहार, आता आंध्र प्रदेशात भीषण रेल्वे अपघात झाला. अपघातातील मृतांची संख्या 13 वर पोहोचली आहे. त्याचबरोबर या अपघातात 54 हून अधिक जण जखमी झाले आहेत. या अपघाताचे कारण रेल्वेने दिले आहे. खरं तर, विझियानगरम जिल्ह्यातील हावडा-चेन्नई मार्गावर एका ट्रेनने सिग्नल ओलांडल्यानंतर आणि दुसऱ्या ट्रेनला धडकल्यानंतर अनेक डबे रुळावरून घसरले. हा अपघात संध्याकाळी 7 च्या सुमारास झाला, जिथे 08532 विशाखापट्टणम-पलासा पॅसेंजर ट्रेन आणि 08504 विशाखापट्टणम-रायगडा पॅसेंजर स्पेशल यांच्यात धडक झाली.

Train Accident
"पॅसेंजर ट्रेन रुळावर उभी होती त्याचवेळी मागून दुसरी ट्रेन आली अन्..."; आंध्र प्रदेशात भीषण रेल्वे अपघात, 6 ठार, 25 जखमी

ईस्ट कोस्ट रेल्वे (ईसीओआर) ने सांगितले की, आंध्र प्रदेशातील विजयनगरम जिल्ह्यात दोन गाड्यांची टक्कर मानवी चुकांमुळे झाली असावी. मुख्य जनसंपर्क अधिकारी विश्वजीत साहू म्हणाले, "विशाखापट्टणम-रायगडा पॅसेंजर स्पेशल ट्रेनने सिग्नलचे 'ओव्हरशूटिंग' केले होते. त्यामुळे दोन्ही गाड्या एकमेकांवर आदळल्याची माहिती आहे.

ओव्हरशूटिंग या शब्दाचे स्पष्टीकरण देताना मुख्य जनसंपर्क अधिकारी म्हणाले की, जेव्हा एखादी ट्रेन लाल सिग्नलवर थांबण्याऐवजी पुढे जाते तेव्हा असे घडते. अन्य एका रेल्वे अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या अपघातामुळे विशाखापट्टणम-पलासा पॅसेंजर ट्रेनचे (ट्रेन क्रमांक ०८५३२) मागील दोन डबे आणि विशाखापट्टणम-रायगडा पॅसेंजरचे लोको कोच (ट्रेन क्रमांक ०८५०४) रुळावरून घसरले.

अपघाताची माहिती मिळताच एनडीआरएफच्या दोन तुकड्या बचावकार्यासाठी घटनास्थळी पोहोचल्या. जखमींना रुग्णालयात नेण्यात आले. सर्व जखमींवर उपचार सुरू आहेत.

Train Accident
Train Accident in Andhra Pradesh: विजयनगरममध्ये भीषण रेल्वे अपघात, दोन पॅसेंजर ट्रेनमध्ये धडक; एकाचा मृत्यू, १० जखमी

मुख्यमंत्र्यांनी दिले आदेश, हेल्पलाइन क्रमांक जारी

मुख्यमंत्री वाय.एस.जगन मोहन रेड्डी यांनी तात्काळ मदत उपाययोजना करण्याचे आणि विशाखापट्टणम आणि विजयनगरमच्या जवळच्या जिल्ह्यांमधून जास्तीत जास्त रुग्णवाहिका पाठवण्याचे आदेश दिले आहेत. जखमींना चांगले उपचार मिळावेत यासाठी जवळच्या हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारची व्यवस्था करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.मुख्यमंत्र्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना आरोग्य, पोलिस आणि महसूल यासह इतर सरकारी विभागांशी समन्वय साधून तातडीने मदत उपाययोजना करण्याचे आदेश दिले आणि जखमींना तातडीने वैद्यकीय सेवा मिळतील याची खात्री केली.

Train Accident
Kerala Blast: केरळमधील व्यक्तीने घेतली बॉम्बस्फोटाची जबाबदारी, पोलिसांसमोर केले आत्मसमर्पण; UAPA अंतर्गत गुन्हा दाखल

या अपघातानंतर रेल्वे मंत्रालयाने काही हेल्पलाइन क्रमांकही जारी केले आहेत. बीएसएनएल क्रमांक 08912746330 08912744619 एअरटेल - 8106053051 8106053052 बीएसएनएल - 8500041670 8500041671.

मृतांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई मिळेल

या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या आंध्र प्रदेशातील मृतांच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपयांची भरपाई दिली जाणार असून अन्य राज्यांतून आलेल्या मृतांच्या कुटुंबीयांना 2 लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे. गंभीर जखमींना ५० हजार रुपयांची मदत देण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.