Odisha Train Accident : मृत्यूचं तांडव! ओडिशा रेल्वे अपघातातील मृतांची संख्या 233, तर 900 पेक्षा जास्त प्रवासी जखमी

कोरोमंडल एक्सप्रेस आणि मालगाडी या दोन्ही गाड्या एकाच वेळी एकाच रुळावर आल्याने हा भीषण
Odisha Train Accident
Odisha Train Accident Esakal
Updated on

ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यामध्ये काल सायंकाळी सातच्या सुमारास तीन रेल्वे गाड्यांचा मोठा अपघात झाला. या भयंकर अपघातातील मृतांची संख्या 233 वर पोहोचली आहे. 300 च्या आसपास लोक गंभीर जखमी झाले आहेत. तसेच अपघातात आतापर्यंत 900 पेक्षा जास्त प्रवासी जखमी झाले आहेत. कालपासून सुरू असलेलं बचाव कार्य अजूनही सुरू आहे.

हा भीषण अपघात झाला तेव्हा या अपघातात 50 ते 70 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. रात्री उशिरा हा आकडा 120 वर पोहोचला. तसेच जखमींचा आकडाही 350 वर गेला. मात्र, सकाळपर्यंत मृतांचा आकडा 233 आणि जखमींचा आकडा 900 झाला आहे. अजूनही बचावकार्य सुरू असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

या अपघातात जखमी झालेल्या प्रवाश्यांना सोरो सीएसी, गोपालपूर सीएचसी आणि खांटापाडा पीएचसीमध्ये दाखल करण्यात आलं असून सध्या या मार्गावरील सर्व रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच मदतकार्यासाठी या ठिकाणी एनडीआरएफची पाच पथक बचावकार्य करत आहेत.

या रेल्वे अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना 10 लाखाच्या मदतीची घोषणा करण्यात आली आहे. तसेच गंभीर जखमींसाठी दोन लाख आणि किरकोळ जखमींसाठी 50 हजाराच्या भरपाईची घोषणा करण्यात आली आहे.

Odisha Train Accident
Odisha Coromandel Express Accident: ओडिशा कोरोमंडल रेल्वे अपघातात 70 लोकांचा मृत्यू, 350 हून अधिक जखमी

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या घटनेवर दु:ख व्यक्त केलं आहे. "दुर्घटनेच्या ठिकाणी बचाव कार्य सुरु आहे आणि अपघातातील जखमींना शक्य ती सर्व मदत केली जात आहे," असे त्यांनी ट्विट केले आहे.

कोरोमंडल एक्स्प्रेस आणि मालगाडी या दोन्ही गाड्या एकाचवेळी एकाच रुळावर आल्याने हा भीषण अपघात झाला. सिग्नल यंत्रणेतील दोषामुळे दोन्ही गाड्या एकाचवेळी एका रुळावर आल्याचे म्हंटलं जात आहे.

Odisha Train Accident
Udayanraje Bhosale : प्रतापगड प्राधिकरण अध्यक्षपदी खासदार उदयनराजे; रायगडावरून CM शिंदेंची मोठी घोषणा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.