Islamic State : दहशतवाद्यांची भरती करणारा अबू उस्मान दहशतवादी घोषित; मोदी सरकारची मोठी कारवाई

केंद्रशासित प्रदेशातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकार 1800 निमलष्करी दलाचे जवान उतरवणार आहे.
Jammu and Kashmir News
Jammu and Kashmir Newsesakal
Updated on
Summary

अहमद अहंगर उर्फ ​​अबू उस्मान अल-काश्मिरी याला UAPA कायदा 1967 अंतर्गत दहशतवादी घोषित करण्यात आलंय.

जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) कट्टरतावादी शक्तींच्या बळामुळं दहशतवादी घटना वाढण्याचा धोका केंद्र सरकारनं पुन्हा एकदा व्यक्त केला आहे.

पहिल्या अहवालांत केंद्रशासित प्रदेशातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकार 1800 निमलष्करी दलाचे जवान उतरवणार असल्याचा दावा केला जात असतानाच, आता गृह मंत्रालयानं जम्मू-काश्मीरमध्ये इस्लामिक स्टेट (Islamic State) सक्रिय असल्याचं म्हटलंय. अहमद अहंगर याला यूएपीए कायद्यांतर्गत दहशतवादी घोषित करण्यात आलंय.

Jammu and Kashmir News
Shahajibapu Patil : अजितदादांनी धर्मवीर संभाजी महाराज असं म्हटलं तर..; वादात शहाजीबापूंची उडी

गृह मंत्रालयानं जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, अहमद अहंगर उर्फ ​​अबू उस्मान अल-काश्मिरी याला UAPA कायदा 1967 अंतर्गत दहशतवादी घोषित करण्यात आलंय. श्रीनगरचा रहिवासी असलेला अबू उस्मान सध्या अफगाणिस्तानमध्ये असून जम्मू-काश्मीरमधील इस्लामिक स्टेटसाठी दहशतवाद्यांची मुख्य भरती करणाऱ्यांपैकी एक आहे.

Jammu and Kashmir News
Air India : विमानात महिलेच्या अंगावर लघवी करणाऱ्याविरुध्द गुन्हा दाखल; प्रवासावर 30 दिवसांची बंदी!

1974 मध्ये नवाकडल श्रीनगर इथं जन्मलेल्या अहंगरचे अल कायदा आणि इतर जागतिक संघटनांशी जवळचे संबंध आहेत. तो सध्या भारतात इस्लामिक स्टेटसाठी भरतीचा मार्ग खुला करण्याचा प्रयत्न करत आहे. अधिसूचनेनुसार, अहंगर काश्मीरमध्ये दहशतवादाला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करत असून त्यासाठी त्याच्या काश्मीर-आधारित नेटवर्कवरून लोकांची ओळख पटवण्यास सुरुवात केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.