Inflation : महागाई वाढल्याने क्रयशक्तीमध्ये घट ;मोदी सरकारवर काँग्रेसची टीका

गेल्या दहा वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने घेतलेल्या चुकीच्या आर्थिक निर्णयामुळे कंबरतोड महागाई वाढल्याने सर्वसामान्य लोकांची खरेदी करण्याची शक्ती कमी झाल्याचा आरोप काँग्रेसचे महासचिव खासदार जयराम रमेश यांनी केला आहे.
Inflation
Inflation sakal
Updated on

नवी दिल्ली : गेल्या दहा वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने घेतलेल्या चुकीच्या आर्थिक निर्णयामुळे कंबरतोड महागाई वाढल्याने सर्वसामान्य लोकांची खरेदी करण्याची शक्ती कमी झाल्याचा आरोप काँग्रेसचे महासचिव खासदार जयराम रमेश यांनी केला आहे.

केंद्र सरकारने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीतून एक गोष्ट स्पष्ट होत आहे की, कामगारांची क्रयशक्ती १० वर्षांपूर्वीपेक्षा सुद्धा कमी झालेली आहे. वेतनात कमी वाढ व अभूतपूर्व महागाईमुळे ही स्थिती झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. श्रमिक ब्युरोने जाहीर केलेल्या वेतन दर निर्देशांकानुसार २०१४ ते २०२३ या काळात कामगारांची मजुरीमध्ये वाढ झाली नव्हती.

कोविड काळात तर ही घट उणे झाली होती. डॉ. मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात मजुरी दरवर्षी ६.८ टक्के दराने वाढत होती तर पंतप्रधान मोदींच्या कार्यकाळात मजुरीत १.३ टक्क्यांनी घट झाली आहे. कामगारांच्या परिस्थितीमध्ये सुधारणा करण्यासाठी काँग्रेसने जाहीरनाम्यात अनेक योजना जाहीर केल्या होत्या. मनरेगा योजनेअंतर्गत मजुरांना ४०० रुपये प्रतिदिन वेतन देण्याची अंमलबजावणी केंद्र सरकारने करावी, अशी मागणी खासदार रमेश यांनी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com