संरक्षणमंत्री राजनाथ सिंह कोरोना पॉझिटिव्ह; होम आयसोलेशनमध्ये उपचार सुरु

पूर्ण लसीकरणाच्या नऊ महिन्यानंतर झाले कोरोना संक्रमित
Rajnath Singh,defence ministry
Rajnath Singh,defence ministry Sakal
Updated on

नवी दिल्ली : देशात सध्या तिसऱ्या लाटेचा उद्रेक (Third wave outbreak) पहायला मिळतोय यामध्ये अनेक राजकीय व्यक्तींना कोरोनाची बाधा झाल्याचं दिसून आलं आहे. त्यातच आता देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. याची माहिती त्यांनी स्वतः ट्विट करुन दिली. (Defence Minister Rajnath Singh test positive for COVID19)

राजनाथ म्हणाले, "मला कोरोनाचा संसर्ग झाला असून सौम्य लक्षण आहेत. सध्यातरी मी घरीच क्वारंटाइन झालो आहे. खबरदारी म्हणून माझ्या संपर्कात आलेल्या लोकांनी टेस्ट करुन घ्यावी तसेच क्वारंटाइन व्हावं असं आवाहनही त्यांनी केलं आहे"

Rajnath Singh,defence ministry
आमचे मालक सदावर्ते, कृती समितीसोबत देणंघेणं नाही - कर्मचारी

राजनाथ सिंह यांनी गेल्या वर्षी मार्चमध्ये कोरोनाचा पहिला डोस घेतला होता. त्यावेळी राजनाथ यांनी ट्विट करुन म्हटलं होतं की, "बस्स झालं आता! आरआर रुग्णालयात मी कोरोनाचा पहिला डोस घेतला आहे. कोरोना लसीकरण मोहिमेद्वारे कोरोनामुक्त बनवण्याचा भारताचा संकल्प अधिक मजबूत झाला आहे. लस पूर्णतः सुरक्षित आणि कुठलाही त्रास न देणारी आहे"

पूर्ण लसीकरणानंतर नऊ महिन्यांनी झाले संसर्गबाधित

राजनाथ सिंह यांनी जेव्हा कोरोना लसीचा पहिला डोस घेतला होता तेव्हा कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोनच लस दिल्या जात होत्या. त्या अनुक्रमे २८ आणि ४२ दिवसांच्या अंतरानं दिल्या जात होत्या. यावरुन असं दिसतं की, राजनाथ यांनी कोरोना लसीचा दुसरा डोस महिन्याभरात म्हणजेच एप्रिलमध्ये घेतला असेल. म्हणजेच जवळपास त्यांचं पूर्ण लसीकरण झाल्यानंतर नऊ महिन्यानंतर ते कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.