संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय! 28,732 कोटींच्या शस्त्रास्त्र खरेदीला मंजुरी

defence ministry clears arms procurement cases worth over rs 28732 crore for defence forces
defence ministry clears arms procurement cases worth over rs 28732 crore for defence forces esakal
Updated on

संरक्षण मंत्रालयाने सशस्त्र ड्रोन, कार्बाइन आणि बुलेटप्रूफ जॅकेटसह संरक्षण दलांसाठी 28,732 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची शस्त्रे खरेदी करण्यास मंजुरी दिली आहे. राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संरक्षण अधिग्रहन परिषदेच्या बैठकीत एलओसी वर तैनात सैनिकांच्या सुरक्षेसाठी बुलेटप्रूफ जॅकेटच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे, असे संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे.

एलएसी आणि पूर्व सीमेवर पारंपारिक, हायब्रीड युद्ध आणि आतंकवाद विरोधी कारवायांसाठी त्यांना समाविष्ट करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे, असे संरक्षण मंत्रालयाने सांगितले. लष्करासाठी 4 लाख क्लोज क्वार्टर बॅटल कार्बाइन्स मंजूर करण्यात आल्या आहेत.

संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार आधुनिक युद्धात भारतीय सैन्याची क्षमता वाढवण्यासाठी DAC द्वारे स्वायत्त पाळत ठेवण्यासाठी आणि सशस्त्र ड्रोनच्या स्वार्म्सच्या खरेदीला मान्यता देण्यात आली आहे. सागरी सुरक्षा वाढविण्यासाठी 14 जलद गस्ती जहाजे घेण्याच्या भारतीय तटरक्षक दलाच्या प्रस्तावालाही DAC ने मंजुरी दिली आहे. यासोबतच नौदलाच्या 1250 किलोवॅट क्षमतेच्या मरीन गॅस टर्बाइन जनरेटरच्या अद्ययावतीकरणाच्या प्रस्तावालाही मान्यता देण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.