कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलमध्ये सुरू होणार आयुर्वेद केंद्र

भारतातील पारंपारिक वैद्यकीय प्रणाली केवळ भारतातच नाही तर परदेशातही मानली जाते.
Ayurveda
Ayurvedagoogle
Updated on

नवी दिल्ली : भारतातील पारंपारिक वैद्यकीय प्रणाली केवळ भारतातच नाही तर परदेशातही मानली जाते. कोरोना महामारीनंतर (Corona Pandemic) केवळ भारतातच नाही तर परदेशातही आयुर्वेद (Ayurveda) पद्धतीच्या उपचारासाठी आयुर्वेदाबद्दल विश्वासार्हता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. याचाच एक भाग म्हणून संरक्षण मंत्रालय (Defense Ministry ) आणि आयुष (Ministry of AYUSH) मंत्रालयाने एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी संरक्षण मंत्रालयाने 37 छावणी रुग्णालये आणि 12 लष्करी आरोग्य सेवा सुविधांकेंद्रामध्ये आयुर्वेद केंद्रे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. संरक्षण मंत्रालयाने बुधवारी ही माहिती दिली असून, आयुर्वेद केंद्र सुरू करण्यासाठी आयुष मंत्रालयासोबत दोन सामंजस्य करार करण्यात आल्याची माहिती मंत्रालयाने दिली आहे. (Ayurveda Centres At Cantonment Hospitals)

Ayurveda
प्रशांत किशोरांच्या प्रस्तावावर काँग्रेस 72 तासांत अहवाल सादर करणार

या ३७ कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलमध्ये १ मे २०२२ पासून आयुर्वेद केंद्र कार्यान्वित होणार आहे. आयुष मंत्रालय या ३७ कॅन्टोन्मेंट रुग्णालयांना कुशल आयुष डॉक्टर आणि फार्मासिस्ट प्रदान करणार आहे. संरक्षण मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, संरक्षण मंत्रालयाने (MoD) आयुष मंत्रालयाशी (MoA) दोन सामंजस्य करारांवर स्वाक्षरी केली आहे. यापैकी एक सामंजस्य करार 37 छावणी रुग्णालयांमध्ये आयुर्वेद केंद्रे सुरू करण्यासाठी आणि दुसरा सशस्त्र दल वैद्यकीय सेवेच्या (AFMS) 12 लष्करी रुग्णालयांमध्ये आयुर्वेद केंद्रे स्थापन करण्यासाठी स्वाक्षरी करण्यात आला आहे.

Ayurveda
दिल्लीत कोरोनाचा आलेख वाढताच; 24 तासात 1009 रूग्णांची भर

जागतिक आयुष गुंतवणूक आणि नवोन्मेष शिखर परिषदेदरम्यान या संदर्भात दोन सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. महात्मा मंदिर, गांधीनगर येथे तीन दिवसीय जागतिक आयुष गुंतवणूक आणि नवोपक्रम समिटचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थितांना संबोधित केले. तर, यावेळी जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख (WHO) टेड्रोस गेब्रेयसस देखील उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()