Indian Army : ड्रॅगनला सडेतोड उत्तर देण्यासाठी भारतीय लष्कराचे Project Zorawar

शेजारी देशांसोबतच्या तणावादरम्यान भारत आपली लष्करी क्षमता वाढवण्यावर भर देत आहे.
Indian Army
Indian Army Sakal
Updated on

Project Zorawar : शेजारी देशांसोबतच्या तणावादरम्यान भारत आपली लष्करी क्षमता वाढवण्यावर भर देत असून, मोठ्या प्रमाणात सतत कुरघोडी करणाऱ्या चीनला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने प्रोजेक्ट जोरावर (Project Zorawar) सुरू केला आहे. उंचावरील भागात भारतीय लष्कराची क्षमता वाढवण्यासाठी भारत हलके टँक विकसित करण्याची तयारी करत आहे. यासाठी भारतीय लष्कराने सुमारे 350 स्वदेशी लाइट टँक समाविष्ट करण्यासाठी Project Zorawar सुरू केला आहे.

Indian Army
Ganeshotsav 2022 : पुण्यात ऐन गणेशोत्वात रंगणार 'सत्तांतराचा' खेळ

पूर्व लडाखला लागून असलेल्या LAC वर म्हणजेच प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर हे रणगाडे तैनात करण्याची भारतीय लष्कराची योजना आहे, जेणेकरून ड्रॅगनच्या कोणत्याही हालचालीला तत्काळ उत्तर देणे शक्य होणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हलके रणगाडे घेण्यासाठी भारतीय लष्कर लवकरच संरक्षण मंत्रालयाकडून मंजुरी घेणार असून, मेक इन इंडिया अंतर्गत या लाइट टँकची निर्मिती देशातच करण्याची योजना आहे. पूर्व लडाखमध्ये चीनसोबत सुरू असलेल्या 27 महिन्यांच्या लष्करी संघर्षातून मिळालेल्या धड्यांमधून Project Zorawar उदयास आला आहे. ज्यामध्ये सैन्याने रणगाडे, हॉवित्झर आणि पृष्ठभागावरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र प्रणाली यासारखी शस्त्र प्रणाली तैनात केली आहे.

Indian Army
Nitin Gadkari : आगामी निवडणुकीबाबत गडकरींचं मोठं विधान म्हणाले, 'तरीही मला लोकं...'

टँकची वैशिष्ट्य काय असणार?

• Project Zorawar प्रकल्पाअंतर्गत निर्मिती करण्यात येणाऱ्या टँकचं वजन सुमारे 25 टन असेल.

• कमी वजनामुळे LAC पर्यंत पोहोचणे सोपे होईल.

• हलक्या वजनाचे टँक उंच डोंगरावरून खिंडीपर्यंत जाण्यास सक्षम असणार.

• या टँकमध्ये अवजड टँकप्रमाणेच फायरिंग पॉवर असेल.

• Project Zorawar अंतर्गत तयार केलेली हलकी टँक कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) सक्षम ड्रोनने सुसज्ज असतील.

• जलद हालचालीसाठी लष्कराला Project Zorawar ची मदत मिळणे शक्य.

Indian Army
Agniveer Test : भरतीत अपयशी ठरलेल्या 23 वर्षीय युवकाची आत्महत्या

भारतीय लष्कराकडे सध्या कोणत्या प्रकारचे रणगाडे आहेत?

भारतीय लष्कराकडे सध्या उपलब्ध असलेले रणगाडे मैदानी किंवा वाळवंटी भागासाठी आहेत. रशियन T-72 किंवा T-90 किंवा स्वदेशी अर्जुन टँक आदींचा यामध्ये समावेस आहे. या सर्वांचे वजन 45-70 टन आहे. T-90S आणि T-72 टँक प्रामुख्याने साध्या आणि वाळवंटातील ऑपरेशन्ससाठी तयार करण्यात आल्या होत्या. त्यामुळे त्यांचा उच्च उंचीच्या भागात वापरावर मर्यादा आहेत. अशा परिस्थितीत T-72 आणि इतर जड टँकसाठी LAC पर्यंत पोहोचण्यासाठी काही अडचणींचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत हलक्या रणगाड्यांद्वारे भारतीय लष्कराला आपली ताकद वाढवायची आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.