नियंत्रण रेषेवर पाकिस्तानातून दहशतवाद्यांच्या घुसखोरीचे 12 प्रयत्न लष्कराने हाणून पाडले.
अरुणाचल प्रदेशमधल्या तवांग सेक्टरमध्ये (Tawang Sector) यांग्त्से भागात भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झटापट झाली. 9 डिसेंबरला भारतात चिनी सैनिकांकडून (China Army) घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला आणि तो भारतीय सैनिकांनी हाणून पाडला.
आता भारतीय संरक्षण मंत्रालयानं (Indian Ministry of Defence) चीनसह पाकिस्तानला (Pakistan) थेट इशारा दिलाय. संरक्षण मंत्रालयानं म्हटलंय की, आधुनिकीकरण आणि शत्रूंच्या आक्रमक कृतींमुळं उद्भवणाऱ्या सर्व लष्करी धोक्यांना तोंड देण्यासाठी भारतीय लष्कर तयार आहे. वास्तविक, नियंत्रण रेषेवर (एलएसी, एलओसी) स्थिरता राखण्यासाठी लष्कर प्रयत्न करत आहे.
भारतीय लष्कर (Indian Army) सतत राष्ट्रीय सुरक्षेसाठी उदयोन्मुख धोक्यांचं निरीक्षण करत आहे. संरक्षण मंत्रालयानं आपल्या वार्षिक अहवालात म्हटलंय, गेल्या वर्षी फेब्रुवारीपासून भारत आणि पाकिस्तान सैन्यांमध्ये झालेल्या समझोत्यानं नियंत्रण रेषेवरील परिस्थिती तुलनेनं शांत राहिलीय. मात्र, पाकिस्ताननं दहशतवादी प्रशिक्षण शिबिरं, वारंवार घुसखोरीचा प्रयत्न अशी मोहीम सुरुच ठेवलीय. एवढंच नाही, तर अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या टोळ्यांच्या मदतीनं देशातील तरुणांची दिशाभूल करण्याचा कटही पाकिस्तान रचत आहे. या तरुणांना दहशतीच्या मार्गावर ढकलण्यासाठी सीमेपलीकडून शस्त्रंही पुरवली जाताहेत.
ब्रह्मोस क्षेपणास्त्र, पृथ्वी-2 क्षेपणास्त्र, अग्नी-IV आणि अग्नी-III या क्षेपणास्त्रांच्या यशस्वी चाचणीनं आपली ताकद आणखी मजबूत केली आहे. पाणबुडीतून प्रक्षेपित केलेल्या INS अरिहंत या बॅलेस्टिक क्षेपणास्त्रासह स्वदेशी बनावटीच्या 'हेलिना'च्या यशस्वी चाचणीचाही यात समावेश आहे. 2020 मध्ये 4645 युद्ध उल्लंघनाच्या तुलनेत फेब्रुवारी 2021 पासून अशा केवळ तीन घटना घडल्या आहेत. 2022 मध्ये फक्त एकदाच सीमेपलीकडून गोळीबार झाला होता.
या वर्षात नियंत्रण रेषेवर पाकिस्तानातून दहशतवाद्यांच्या घुसखोरीचे 12 प्रयत्न लष्कराने हाणून पाडले. यादरम्यान 18 दहशतवादी ठार झाले असून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला.
सायबर, अंतराळ आणि माहिती क्षेत्रामध्ये उदयोन्मुख धोक्यांना सामोरे जाण्याची क्षमता देखील लष्कर तयार करत आहे.
संरक्षण मंत्रालयानं निदर्शनास आणून दिलं की, लष्करानं सातत्यानं बंडखोरी आणि दहशतवादविरोधी कारवाया केल्या आहेत. लष्कर राष्ट्रीय सुरक्षेसाठी भविष्यातील धोक्यांचा सतत आढावा घेत आहे. भारतीय लष्कराच्या सर्व रचना एकात्मिक लढाई गट (IBG) मॉडेलवर टप्प्याटप्प्यानं एकत्रित केल्या जातील, असं संरक्षण मंत्रालयानं अहवालात नमूद केलंय. IBG चांगली प्रगती करत असून पहिला टप्पा पूर्ण होत आहे. यामध्ये तोफखाना, रणगाडे, हवाई संरक्षण घटकांचा समावेश आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.