Delhi : थेट परकीय गुंतवणुकीत २४ टक्के घसरण,नेदरलँड, जपान व जर्मनीचा वाढता कल; राज्यांमध्ये महाराष्ट्र आघाडीवर

आज प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.
Delhi news
Delhi newsesakal
Updated on

नवी दिल्ली : देशात एप्रिल ते सप्टेंबर या सहामाहीत थेट परकी गुंतवणूक २४ टक्क्यांनी घसरून २०.४८ अब्ज डॉलर झाली आहे. संगणक हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर, दूरसंचार, वाहन आणि औषधनिर्माण क्षेत्रातील गुंतवणूक कमी झाल्यामुळे यात घसरण झाल्याचे सरकारने आज प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

Delhi news
Hair Care Tips : हिवाळ्यात केसांची काळजी घेण्यासाठी 'या' गोष्टीचा करा वापर, केसांना मिळतील फायदे

गेल्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत थेट परकी गुंतवणूक २६.९१ अब्ज डॉलर होती. जानेवारी-मार्च या तिमाहीमधील गुंतवणूकदेखील ४०.५५ टक्क्यांनी घसरून ९.२८ अब्ज डॉलर झाली. गेल्या वर्षी एप्रिल ते जून या कालावधीत ती ३४ टक्क्यांनी घसरून १०.९४ अब्ज डॉलरवर आली होती. एप्रिल, मे, जून, जुलै आणि ऑगस्टमध्ये परदेशातील गुंतवणूक कमी झाली. तथापि, सप्टेंबरमध्ये, गेल्या वर्षीच्या याच महिन्यात २.९७ अब्ज डॉलरच्या तुलनेत ते ४.०८ अब्ज डॉलरपर्यंत वाढले आहे, असे डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटरनल ट्रेडच्या आकडेवारीवरून दिसून आले.

या आर्थिक वर्षाच्या सहामाहीत, सिंगापूर, मॉरिशस, यूएस, ब्रिटन आणि संयुक्त अरब अमिराती या प्रमुख देशांमधून होणारी थेट परकी गुंतवणूक कमी झालीआहे.एप्रिल-सप्टेंबरदरम्यान केमन आयलंड आणि सायप्रसमधून होणाऱ्या गुंतवणुकीत लक्षणीय घट झाली आहे, तर नेदरलँड, जपान आणि जर्मनीमधून आवक वाढली. संगणक सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर, व्यापार, सेवा, दूरसंचार, वाहन, फार्मा आणि रसायने या क्षेत्रात घट झाली, तर बांधकाम, धातू उद्योगात आवक वाढली. हाराष्ट्रात या कालावधीत सर्वाधिक ७.९५ अब्ज डॉलरची आवक झाली असली, तरी ती मागील वर्षीच्या याच कालावधीतील आठ अब्ज डॉलरच्या तुलनेत कमी  आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.