राजधानी दिल्ली आणि एनसीआरमधील वायू प्रदूषणामुळे लोकांच्या समस्या वाढल्या आहेत. शहरातील एअर क्वालिटी इंडेक्स (AQI)अत्यंत धोकादायक पातळीवर पोहोचला आहे. नोएडा, गाझियाबाद आणि गुरुग्राममध्ये सर्वात जास्त धोका निर्माण. येथेही मंगळवारी पहाटे दिल्ली-एनसीआरमधील मध्ये अनेक ठिकाणी AQI 500 वर पोहचला. यापूर्वी सोमवारीही AQI पातळी 500 च्या वर पोहचली होती. त्यामुळे काही शाळा काॅलेज बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.