नवी दिल्ली : दिल्ली-एनसीआरमध्ये वायू प्रदुषणानं पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. यावर नियंत्रणासाठी सरकार अनेक पावलं उचलतं आहे. पण तरीही याचा कुठलाही फायदा होताना दिसत नाहीए. दरम्यान, भारतातील अमेरिकेचे राजदूत एरिक गार्सेटी यांच्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या. लॉस एन्जेलिसमधील आपल्या जुन्या वास्तव्याचा दाखला त्यांनी यासाठी दिला. (Delhi air pollution US ambassador to India Eric Garcetti Says It Brings Back Memories Of Los Angeles)
गार्सेटी म्हणाले, दिल्लीतील सध्याच्या परिस्थितीनं त्यादिवसांच्या आठवणी ताज्या केल्या. एक काळ होता जेव्हा संपूर्ण अमेरिकेत सर्वाधिक प्रदुषित हवा ज्या शहरातील होती ते शहर म्हणजे लॉस एन्जेलिस होतं. त्यावेळी आमच्या शिक्षकांनी आम्हाला बाहेर खेळण्यास मनाई केली होती. त्याचप्रकारे आज माझ्या मुलीला शाळेत सोडल्यानंतर तिच्या शिक्षकांनी मनाई केली. (Marathi Tajya Batmya)
राजधानी दिल्लीत हवेचा वेग कमी असल्यानं इथलं वायू प्रदुषण जीव गुदमरवून टाकतं आहे. गुरुवारी पुन्हा एकदा एनसीआरमध्ये दिल्लीच्या हवेची नोंद गंभीर श्रेणीत झाली आहे. सफर इंडियाच्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी दिल्लीत समर्ग वायू गुणवत्ता निर्देशांक (AQI) ३४३ नोंदवण्यात आला आहे. (Latest Marathi News)
हा निर्देशांत अत्यंत खराब हवेसाठी दिला जातो. त्याचबरोबर नोयडामध्ये समग्र वायू गुणवत्ता निर्देशांक (AQI) 397 जे खूपच खराब हवेसाठी आहे.
बुधवारी दिल्लीच्या हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) 364 नोंदवण्यात आला होता. या सिझनमधील हा सर्वाधिक एक्यूआय आहे. सलग पाचव्या दिवशी अशा प्रकारे खराब हवा नोंदवली गेली आहे. मंगळवारच्या तुलनेत बुधवारी एक्यूआय निर्देशांकात पाच अकांनी वाढ झाली. एनसीआरनंतर ग्रेटर नोयडा सर्वाधित प्रदुषित शहर राहिलं आहे. दिल्लीची हवा सर्वच स्तरातून खराब राहिली.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.