दिल्लीत ओमिक्रॉनचा रुग्ण; धारावीत आफ्रिकेतून आलेल्या एकाला कोरोना

दिल्लीत ओमिक्रॉनचा रुग्ण; धारावीत आफ्रिकेतून आलेल्या एकाला कोरोना
Updated on
Summary

जवळपास १७ जण टांझानियाहून दिल्लीत परतले असून त्यांचीही टेस्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांनी दिली आहे.

दिल्ली - जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनाच्या नव्या व्हेरिअंटने चिंता वाढवली आहे. ओमिक्रॉन हा जास्त संसर्गक्षम असून दिल्लीत एकाला ओमिक्रॉनची लागण झाली आहे. तर मुंबईत आफ्रिकेतून परतलेल्या एकाला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. दिल्लीत एलएनजेपी रुग्णालयात टांझानियातून परतलेल्या रुग्णावर उपाचर सुरु आहेत. तर जवळपास १७ जण टांझानियाहून दिल्लीत परतले असून त्यांचीही टेस्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांनी दिली आहे.

दिल्लीत ओमिक्रॉनचा रुग्ण; धारावीत आफ्रिकेतून आलेल्या एकाला कोरोना
देशात कोरोना मृत्यूच्या आकड्यात अचानक वाढ, २४ तासांत ८८९५ नवे रुग्ण

सधअया देशातील ओमिक्रॉनचे ४ रुग्ण आढळले आहेत. यामध्ये कर्नाटकात २, महाराष्ट्रात १ आणि दिल्लीत एक रुग्ण आहे. भारतात सर्वात पहिल्यांदा कर्नाटकात दोन रुग्ण सापडल्यानंतर खळबळ उडाली होती. त्यापाठोपाठ महाराष्ट्रात डोंबिवलीत कोरोनाचा पहिला रुग्ण शनिवारी आढळला होता. त्यानंतर आता धारावीत आफ्रिकेतून परतलेल्या एकाला कोरोनाची लागण झाल्यानं ओमिक्रॉनचा धोका वाढल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.