दिल्ली भाजप अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांची तब्यत आज अचानक बिघडल्याची घटना समोर आली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार त्यांना स्किन इंफेक्शन आणि श्वास घेण्यास अडचण होत असल्याचे सांगण्यात येत आहे. महत्वाची बाब म्हणजे नुकतेच वीरेंद्र सचदेवा यांना यमुना नदीच्या पाण्यात 'डुबकी' घेतली होती.