Delhi Election : पराभव जिव्हारी; भाजप अध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा, गौतम गंभीर होणार अध्यक्ष?

दिल्ली महानगरपालिका निवडणुकीत सत्ताधारी भाजपला मोठा झटका बसला आहे.
Adesh Gupta Resigns
Adesh Gupta Resignsesakal
Updated on
Summary

दिल्ली महानगरपालिका निवडणुकीत सत्ताधारी भाजपला मोठा झटका बसला आहे.

नवी दिल्ली : दिल्ली महानगरपालिका निवडणुकीत सत्ताधारी भाजपला मोठा झटका बसलाय. निवडणुकीत आपला पूर्णपणं बहुमत मिळालंय. आम आदमी पक्षानं (AAP) भारतीय जनता पक्षाला (BJP) 15 वर्षांनंतर सत्तेतून बाहेरचा रस्ता दाखवला आहे.

निवडणुकीत 'आप'नं 134 जागा जिंकल्या आहेत, तर भाजपला 104 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. एमसीडीमधील पराभवामुळं दिल्ली भाजपचे अध्यक्ष आदेश गुप्ता यांनी आज म्हणजेच, रविवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. MCD निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी त्यांनी स्वीकारलीय. मिळालेल्या माहितीनुसार, आदेश गुप्ता यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्याकडं राजीनामा सुपूर्द केला. नड्डा यांनीही त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे.

Adesh Gupta Resigns
Narendra Modi : इंडोनेशियानंतर PM मोदींनी नागपुरात वाजवला ढोल; सगळे बघतच राहिले, पाहा अफलातून Video

MCD निवडणुकीत भाजपला मिळाल्या 104 जागा

7 डिसेंबर रोजी झालेल्या निवडणुकीत भाजपला केवळ 104 जागांवर विजय मिळवता आला आहे. त्याचवेळी आम आदमी पक्षानं 134 जागा जिंकल्या आहेत. एमसीडी निवडणुकीत आदेश गुप्ता यांच्या क्षेत्रातही भाजपला जागा जिंकता आल्या नाहीयेत. तेव्हापासून दिल्ली भाजपवर प्रश्न उपस्थित होत आहेत.

Adesh Gupta Resigns
Narendra Modi : स्वार्थी नेत्यांमुळं देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होत चाललीय; PM मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल

गौतम गंभीर अध्यक्षपदाच्या शर्यतीत?

आदेश गुप्ता यांच्या राजीनाम्यानंतर कपिल मिश्रा आणि गौतम गंभीर नवीन अध्यक्षपदाच्या शर्यतीत असल्याचं मानलं जात आहे. तर, दुसरीकडं भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष वीरेंद्र सचदेवा नवीन अध्यक्ष जाहीर होईपर्यंत अध्यक्षपदाची धुरा सांभाळणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.