Delhi Budget : 'केजरीवाल सरकार 20 लाख नोकऱ्या देणार'

Delhi Budget 2022-23
Delhi Budget 2022-23esakal
Updated on
Summary

दिल्लीत नवीन इलेक्ट्रॉनिक शहर स्थापन करण्यात येणार आहे.

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांनी आज विधानसभेत दिल्लीचा अर्थसंकल्प (Delhi Budget 2022-23) सादर केला. भविष्यातील दिल्लीचं चित्र या अर्थसंकल्पात दिसतंय. मनीष सिसोदिया यांच्याकडं दिल्लीच्या अर्थ मंत्रालयाचीही जबाबदारी आहे, त्यामुळं त्यांनी बजेट सादर केलं. दरम्यान, सिसोदिया दिल्लीचा बजेट सादर करण्यासाठी लाल टॅब घेऊन विधानसभेत पोहोचले होते.

अर्थसंकल्प सादर करताना मनीष सिसोदिया म्हणाले, गेल्या वर्षी आप सरकारनं देशभक्तीपर अर्थसंकल्प सादर केला होता, यावेळी आमचा अर्थसंकल्प रोजगाराचा अर्थसंकल्प (Employment Budget) आहे. येत्या पाच वर्षांत दिल्लीतील लोकांना 20 लाख नोकऱ्या देण्याचं सरकारचं लक्ष्य आहे. आम्ही सादर करत असलेला हा 8 वा अर्थसंकल्प आहे. अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या नेतृत्वाखालील 7 व्या बजेटमुळं दिल्लीतील शाळा सुधारल्या आहेत, वीज उपलब्ध झालीय. लोकांना शून्य वीज बिल येतंय. तसंच मेट्रोचा विस्तार झालाय. आता लोकांना सरकारी कार्यालयाच्या फेऱ्याही माराव्या लागणार नाहीत, असं त्यांनी नमूद केलं.

Delhi Budget 2022-23
कर्नाटक सरकार टिपू सुलतानचे धडे बदलणार

75 हजार 800 कोटींचा अर्थसंकल्प

सिसोदिया पुढं म्हणाले, 'आप' सरकारनं गेल्या 7 वर्षात 1 लाख 78 हजार तरुणांना सरकारमध्ये ठोस नोकरी दिलीय. तर, यापूर्वीच्या सरकारनं शून्य नोकऱ्या दिल्या होत्या. यंदाचा अर्थसंकल्प रोजगारावर आधारित आहे. 2022-23 या वर्षासाठी दिल्लीचा अर्थसंकल्प 75 हजार 800 कोटींचा आहे. 2014-15 मधील 30,940 कोटी रुपयांच्या बजेटच्या अडीच पट हा अर्थसंकल्प आहे. या बजेटमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी 6154 कोटी रुपये देण्यात आले आहेत.

Delhi Budget 2022-23
बीरभूम हिंसाचार प्रकरणाला मिळणार गती; CBI टीम बंगालात दाखल

दिल्ली सरकारचं स्टार्टअप धोरण

दिल्लीतील किरकोळ बाजाराला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारनं दिल्ली शॉपिंग फेस्टिव्हल सुरू करण्याची घोषणा केलीय. देश-विदेशातील ग्राहकांना दिल्लीत खरेदी करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी दिल्लीत शॉपिंग फेस्टिव्हलचं आयोजन करण्यात येणार आहे. छोट्या स्थानिक बाजारपेठांना ग्राहकांशी जोडण्यासाठी दिल्ली बाजार पोर्टल सुरू केलं जाईल.

Delhi Budget 2022-23
'RRR'ची 'द काश्मीर फाइल्स'ला जोरदार टक्कर

दिल्लीत इलेक्ट्रॉनिक शहर उभारणार

याशिवाय, सरकार स्टार्टअप धोरण आणत आहे. या नवीन धोरणानुसार, दिल्लीत नवीन इलेक्ट्रॉनिक शहर (Electronic City) स्थापन करण्यात येणार आहे. दिल्लीत होल सेलसाठी होल सेल फेस्टिव्हलचं आयोजन केलं जाईल. गांधी नगर मार्केटमध्ये नवीन हब तयार केला जाईल. तसंच दिल्लीत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचंही (International Film Festival) आयोजन करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.