Delhi Bus Bomb Threat: बसमध्ये सापडली 'टायमर बॉम्ब' सारखी वस्तू; संशयास्पद बॅगेत आणखी काय होतं?

Bomb Threat: बसमधून वायर सदृश संशयास्पद वस्तू जप्त करण्यात आली आहे. बॉम्ब निकामी पथक याबाबत माहिती देणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
Delhi Bus Bomb Threat
Delhi Bus Bomb ThreatEsakal
Updated on

नजफगड परिसरातील क्लस्टर बसमध्ये बॉम्ब असल्याची माहिती मिळाल्याने दिल्लीत दहशत पसरली. माहिती मिळताच दिल्ली पोलीस आणि अग्निशमन विभागाचे पथक घटनास्थळी पोहोचले. परिसरात शोध घेतला. बसमधून वायर सदृश संशयास्पद वस्तू जप्त करण्यात आली आहे. बॉम्ब निकामी पथक याबाबत माहिती देणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

दिल्लीतील नांगलोई येथे डीटीसी क्लस्टर बसमध्ये संशयास्पद बॅग सापडल्यानंतर त्यामध्ये बॉम्ब असल्याची भीती व्यक्त करण्यात आली होती.

दिल्ली पोलिसांच्या म्हणण्यानुसार, संशयास्पद बॅगबद्दल त्यांना कॉल आला होता. त्यांनी सांगितले की, घटनास्थळाची पाहणी केली असता, बॅगमध्ये टायमर बॉम्बसारखी वस्तू आढळून आली.

Delhi Bus Bomb Threat
Patna : पोलिसाच्या मारहाणीत शस्त्रक्रियेचे टाके तुटले;रेल्वे प्रवासी जखमी झाल्याने दोघे निलंबित

दिल्ली अग्निशमन सेवा (DFS) अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री 11:55 वाजता नरेला आणि नजफगढ दरम्यान जाणाऱ्या मार्ग क्रमांक 961 वर क्लस्टर बसमध्ये बॉम्ब असल्याचा कॉल आला. अग्निशमन दलाच्या दोन गाड्या सेवेत लावण्यात आल्या आणि स्थानिक पोलीस तसेच बॉम्ब शोधक आणि निकामी पथकांना पाचारण करण्यात आले.

Delhi Bus Bomb Threat
Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरच्या कुपवाडात चकमक;एक जवान हुतात्मा अन्य चौघेजण गंभीर जखमी

बस कंडक्टर दिवान सिंग, ज्यांनी पोलिसांना कॉल केला, ते म्हणतात, “आम्ही नांगलोईपासून सुरुवात केली, 10-12 प्रवासी तिलंगपूर कोटला येथे उतरले. आम्हाला त्यांच्या सीटखाली बॉम्बसारखे काहीतरी दिसले. आम्ही बस थांबवली, बाकीच्या प्रवाशांना खाली उतरण्यास सांगितले आणि मग आम्ही 100 नंबर डायल केला. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. दिल्ली पोलिसांनी बॉम्ब निकामी पथकाला पाचारण केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.