Punjab: पंजाबमध्ये आप आणि काँग्रेसमध्ये खडाजंगी; 'इंडिया'च्या भवितव्याबाबत केजरीवालांनी स्पष्टच सांगितलं

Arvind Kejriwal
Arvind KejriwalSakal
Updated on

नवी दिल्ली- पंजाबमध्ये आप आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये खडाजंगी सुरु झाली आहे. काँग्रेसचे नेते आणि आमदार सुखपाल खैरा यांना ड्रग्स प्रकरणात अटक करण्यात आली आहे. यावरुन पंजाबमधील आपच्या नेत्यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. दोन्ही पक्ष इंडिया आघाडीतील मित्रपक्ष आहेत. त्यामुळे इंडिया आघाडीमध्ये आम आदमी पक्ष राहील का? असा प्रश्न विचारला जात आहे. (Arvin)d Kejriwal Amid Row With Congress In Punjab

आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी याप्रकरणात स्पष्ट भूमिका मांडली आहे. आपचा इंडिया आघाडीला पूर्ण पाठिंबा आहे. आप पक्ष इंडिया आघाडीशी कटिबद्ध आहे. इंडिया आघाडीपासून आम्ही वेगळे होणार नाही, अशी भूमिका त्यांनी शुक्रवारी मांडली. त्यामुळे पंजाबमध्ये घमासान सुरु असले तरी दोन्ही पक्ष लोकसभा निवडणुकीसाठी एकत्र असतील हे स्पष्ट आहे.

Arvind Kejriwal
Humans of Bombay : चोराच्याच घरी चोरी? काय आहे 'पीपल ऑफ इंडिया' आणि 'ह्यूमन्स ऑफ बॉम्बे' वाद? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

पंजाबमधील सुरु असलेला वाद शांत करण्याचा अरविंद केजरीवाल यांनी प्रयत्न केला आहे. त्यांनी पुढे म्हटलं की, 'पक्ष ड्रग्स विरोधातील लढाई सुरुच ठेवेल. मला कळालं की काँग्रेसच्या एका नेत्याला पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत मला अधिक माहिती नाही. ती माहिती पोलिसांकडून मिळेल. आम्ही ड्रग्स विरोधात युद्ध सुरु केले आहे. मी एका विशिष्ट प्रकरणाबद्दल बोलणार नाही. पण राज्यातील व्यसनाधीनता संपवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.'

आमदार खैरा यांना २०१५ मधील एका ड्रग्स प्रकरणात अटक झाली आहे. आप आणि काँग्रेस इंडिया आघाडीचे सदस्य आहेत. इंडिया आघाडी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करण्यासाठी स्थापन करण्यात आली आहे. दोन्ही पक्षांना एकत्र लढा द्यावा लागणार आहे. पंजाबमध्ये लोकसभेच्या १३ जागा आहेत. या जागांवरुन दोन्ही पक्षांमध्ये मतभेद निर्माण होण्याची शक्यता आहे.

Arvind Kejriwal
Chandrashekhar Bawankule News : पवार व ठाकरेंनी इंडिया आघाडी सोडावी; चंद्रशेखर बावनकुळे यांचा सल्ला

२८ पक्षांनी एकत्र येत इंडिया आघाडी बनवली आहे. त्यांचा मुख्य हेतू भाजपचा पराभव करणे हा आहे. इंडिया आघाडीच्या याआधी काही बैठका झाल्या आहेत. यामध्ये पक्षाच्या नेत्यांनी एकजुट दाखवण्याचा प्रयत्न केलाय. पण,लोकसभेच्या जागावाटपादरम्यान इंडिया आघाडीची खरी एकी दिसून येईल. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.