Arvind Kejriwal: "केजरीवालच घोटाळ्याचे सूत्रधार, हवालाद्वारे गोवा निवडणुकीसाठी पाठवले 45 कोटी"; ईडीने कोर्टात कोणते केले दावे?

Arvind Kejriwal: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केली आहे. त्यामुळे देशभरात खळबळ माजली आहे. काल दिल्ली हायकोर्टाने केजरीवाल यांची अटकेपासून संरक्षण करणाची याचिका फेटाळली.
Arvind Kejriwal
Arvind Kejriwalesakal
Updated on

Arvind Kejriwal:

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केली आहे. त्यामुळे देशभरात खळबळ माजली आहे. काल दिल्ली हायकोर्टाने केजरीवाल यांची अटकेपासून संरक्षण करणाची याचिका फेटाळली. ईडीने हायकोर्टात सबळ पुरावे सादर केले. त्यांनतर काल रात्री 9 च्या दरम्यान केजरीवाल यांना अटक करण्यात आली.

आज ईडीने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना राऊस अव्हेन्यू कोर्टात दाखल केले. केजरीवाल हे दारू धोरण घोटाळ्याचे प्रमुख होते. त्यामुळे त्यांची 10 दिवसांची कस्टडी द्यावी, अशी मागणी ईडीने केली. एम एस जी एसव्ही राजू यांनी न्यायालयाला सांगितले की केजरीवाल गुन्ह्यातून मिळालेल्या पैशाचा वापर करण्यात गुंतले होते आणि धोरण तयार करण्यात त्यांचा थेट सहभाग होता. पॉलिसीच अशा रीतीने बनवण्यात आली होती की त्यामुळे लाच घेणे शक्य झाले. विजय नायर हे केजरीवाल आणि के कविता यांच्यासाठी मध्यस्थ म्हणून काम करत होते, असे ईडीने सांगितले.

विजय मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाजवळ राहत होता. त्यांच्याकडे प्रसारमाध्यमांची जबाबदारी होती. कविता यांनी आम आदमी पार्टीला 300 कोटी रुपये दिल्याचे ईडीने म्हटले आहे. ईडीने कोर्टात 28 पानांचा अहवाल सादर केला.

ईडीने केजरीवाल यांच्यावर लाच मागितल्याचा आरोप केला. विजय नायर कैलाश गेहलोत यांनी दिलेल्या बंगल्यात राहत होते. नायर केजरीवाल यांच्यासाठी काम करत होते. ते केजरीवाल यांच्या खूप जवळचे आहेत. ईडीने अटक आरोपी आणि साक्षीदारांच्या जबाबाचा हवाला दिला. केजरीवाल यांना गोवा-पंजाब निवडणुकीसाठी निधी हवा होता, असा आरोप देखील ईडीने केला आहे.

Arvind Kejriwal
Pune Lok Sabha Poll : पुणे लोकसभेसाठी रवींद्र धंगेकरांच्या उमेदवारीवर आबा बागूलांची पक्षनेतृत्वावर टीका

अंमलबजावणी संचालनालयाने न्यायालयात अनेक लोकांच्या चॅटचा पुरावा दिला. ईडीने सांगितले की, अनेकांना मोठी रोकड देण्यात आली होती. लाचेची रक्कम रोख स्वरूपात देण्यात आली. हे प्रकरण 100 कोटी रुपयांचे नसून 600 कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. ईडीने असेही म्हटले आहे की आमच्याकडे सबळ पुरावे आहेत त्यामुळेच मनीष सिसोदिया यांनाही जामीन मिळत नाही. हवालाद्वारे 45 कोटी रुपये गोव्यात पाठवण्यात आले होते.

केजरीवाल सर्व बाबींसाठी जबाबदार आहेत. केजरीवाल यांना अनेक समन्स बजावण्यात आले पण त्यांनी जाणीवपूर्वक त्यांचे पालन केले नाही. घराच्या झडतीतही त्याने योग्य तथ्य उघड केले नाही, त्यामुळे त्याला अटक करावी लागली.

Arvind Kejriwal
Loksabha Election 2024 : संजय राऊत यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार; नेमकं कारण काय?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.