Sanjay Singh : 2024 मध्ये पराभवाचा भीती...; संजय सिंह यांच्या घरावरील ईडीच्या छाप्यावर केजरीवालांची टीका

amit shah- narendra modi, arvind kejriwal
amit shah- narendra modi, arvind kejriwal
Updated on

नवी दिल्ली - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (CM Kejriwal On ED Action) यांनी कथित दारू घोटाळ्याप्रकरणी आपचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांच्या घरावर पडलेल्या ईडीच्या छापेमारीवरून जोरदार टीका केली आहे. तसेच केंद्र सरकार २०२४ लोकसभा निवडणुकीतील पराभवाच्या भीतीने हे करत असल्याची टीका केजरीवाल यांनी केली.

amit shah- narendra modi, arvind kejriwal
Gold Silver Price Today: सोने 7 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर, काय आहे आजचा भाव?

संजय सिंह यांच्यावरील ईडीच्या कारवाईवर केजरीवाल म्हणाले की, गेल्या एक वर्षापासून आपण पाहतोय की तथाकथित दारू घोटाळ्याबाबत खूप गदारोळ होत आहे. याप्रकरणी आतापर्यंत 1000 हून अधिक छापे टाकण्यात आले. तरी एक पैसाही जप्त झालेला नाही. ते फक्त घोटाळ्याचे आरोप करत राहतात. त्यांनी खूप चौकशी केली पण काहीही सापडलं नाही. संजय सिंह यांच्या घरातूनही तपास यंत्रणेला काहीही मिळणार नाही, असा दावा केजरीवाल यांनी केला.

amit shah- narendra modi, arvind kejriwal
ST Employee DA: एसटी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! रखडलेला महागाई भत्ता अखेर मंजूर, लवकरच निघणार जीआर

केंद्र सरकारवर हल्लाबोल करताना केजरीवाल म्हणाले की, निवडणुका जवळ आल्या आहेत. 2024 मध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यांना असे वाटते की आपण पराभूत होत, आहेत. संजय सिंह यांच्या घरावर ईडीची कारवाई हा हरलेल्या माणसाचा हताश होऊन केलेला प्रयत्न असल्याचं त्यांनी म्हटले आहे.

न्यूजक्लिक प्रकरणातील छाप्यांचा संदर्भ देताना, केजरीवाल म्हणाले, की जे पत्रकारांबाबत झाले, आज ते संजय सिंग यांच्यावर झाले. आता तुम्ही निवडणुकीपर्यंत थांबा, कदाचित तुमच्यासोबतही असे होईल, असंही केजरीवाल यांनी उपरोधिकपणे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.