Arvind kejriwal ED Arrest : EDने अटक केल्यानंतर केजरीवालांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, "माझे जीवन..."

Delhi CM Arvind Kejriwal first reaction after ED arrest : दिल्ली मद्य घोटाळ्या प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केली आहे.
Delhi CM Arvind Kejriwal  first reaction after ED arrest delhi liquor policy case marathi news
Delhi CM Arvind Kejriwal first reaction after ED arrest delhi liquor policy case marathi news
Updated on

Delhi CM Arvind Kejriwal first reaction after ED arrest : दिल्ली मद्य घोटाळ्या प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केली आहे. या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. कोर्टात केजरीवाल यांनी माझं जीवन देशासाठी समर्पित असल्याचे म्हटले आहे. ईडीने दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणात शुक्रवारी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना राउज अवेन्यू कोर्टात सादर केले.

काल रात्री दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ईडीने अटक केली आहे. यानंतर आम आदमी पक्षासह इंडिया आघाडीतील सर्व फक्षांनी भाजप आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. आम आदमी पक्षाचे म्हणणे आहे की जोपर्यंत केजरीवाल यांची सुटका होत नाही तोपर्यंत त्यांचे आंदोलन सुरू राहील. दरम्यान "मी आत असो वा बाहेर, माझे जीवन देशासाठी समर्पित आहे,", अशी प्रतिक्रिया केजरीवाल यांनी दिली आहे.

दरम्यान, दिल्लीच्या कथित मद्य घोटाळा प्रकरणात ईडीने मुख्यमंत्री केजरीवाल यांना नऊ वेळा समन्स पाठवल्यानंतर काल रात्री अखेर अटक केली आहे. काल १०वा समन्स घेऊन आलेल्या अधिकाऱ्यांनी दोन तास त्यांची चौकशी केली आणि त्यानंतर केजरीवाल यांना अटक करण्यात आली.

Delhi CM Arvind Kejriwal  first reaction after ED arrest delhi liquor policy case marathi news
Lok Sabha Election 2024 : शरद पवारांनी डाव टाकला! काँग्रेसकडून कोल्हापूर लोकसभेसाठी शाहू महाराजांना उमेदवारी

यापूर्वी पहिला समन्स ईडीने गेल्या वर्षी २ नोव्हेंबर २०२३ रोजी पाठवण्यात आला. दुसरा समन्स १८ सप्टेंबर २०२३, तीसरा समन्स ३ जानेवारी २०२४, चौधा १८ मार्च, पाचवा २ फेब्रुवारी, सहावा १९ फेब्रुवारी, सातवा २६ फेब्रुवारी, आठवा ४ मार्च आणि नववा १७ मार्च रोजी पाठवण्यात आला होता. केजरीवाल यांनी हे समन्स बेकायदेशीर असल्याचे सांगत या समन्सकडे दुर्लक्ष केलं होतं.

इतके समन्स पाठवून देखील अरविंद केजरीवाल हजर न झाल्याने ईडीने कोर्टात धाव घेतली होती. याविरोधात केजरीवाल देखील हायकोर्टात पोहचले होते. मात्र हायकोर्टाने त्यांना दिलासा देण्यास नकार दिला. यानंतर काल ईडीने १०वा समन्स घेऊन पोहचलेल्या ईडी अधिकाऱ्यांनी केजरीवाल यांना अटक केली.

Delhi CM Arvind Kejriwal  first reaction after ED arrest delhi liquor policy case marathi news
Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांची चौथी यादी जाहीर! १६ नावांची केली घोषणा; येथे पाहा यादी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.