नवी दिल्लीः दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी दावा केला की भाजपमध्ये उत्तराधिकारी बनण्यासाठी युद्ध सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गृहमंत्री अमित शाह यांना उत्तराधिकारी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अमित शाहांसाठी ते रस्ता साफ करत आहेत, असंही केजरीवाल म्हणाले.
'इंडिया टुडे'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये केजरीवाल यांनी विविध मुद्द्यांना हात घातला. सुनीता केजरीवाल यांच्यावरुन भाजपने केजरीवालांवर, ''तुम्ही राबडीदेवी मॉडल स्वीकारत आहात?'' असा आरोप केला आहे. त्यावर उत्तर देताना केजरीवाल म्हणाले की, मी देवाचे आभार मानतो की त्याने मला एक चांगला लाईफ पार्टनर दिला आहे. माझ्यासारख्या सनकी नवऱ्याला त्यांनी आयुष्यभर सहन केलं आहे.
केजरीवाल पुढे म्हणाले, मी जेव्हा इन्कम टॅक्समध्ये कमिश्नरची नोकरी करत होतो तेव्हा एक दिवस अचानक राजीनामा देऊन घरी आलो. घरी आल्यावर राजीनामा दिल्याचं सांगून दिल्लीतल्या झोपडपट्टीमध्ये जावून काम करणार असल्याचं संगितलं. विशेष म्हणजे हे पत्नीला न सांगताच केल्याचं केजरीवाल म्हणाले.
''माझ्या राजीनाम्याच्या निर्णयानंतरही पत्नीने मला साथ दिली, तेव्हा मी राजकारणातही नव्हतो, काहीच फ्युचर नव्हतं.. दिल्लीतल्या झोपडपट्टीत मी दहा वर्षे काम केलं.. हे माझं पॅशन होतं, पत्नीचं नाही'' असं केजरीवाल म्हणाले.
सुनीता केजरीवाल दिल्ली निवडणूक लढणार नाहीत- केजरीवाल
मुलाखतीमध्ये केजरीवाल पुढे म्हणाले की, आता मी जेव्हा जेलमध्ये गेलो तेव्हा त्यांनी (सुनीता) जनता आणि माझ्यामध्ये एका दुव्याचं काम केलं. त्यांना सक्रीय राजकारणात येण्यामध्ये रस नाही. त्या निवडणूक लढणार नाही. येणाऱ्या दिल्लीच्या निवडणुकासुद्धा त्या लढणार नाहीत. या लोकांनी जर मला जेलमध्येच ठेवलं तर मी जेलमधून निवडणूक लढेल आणि ७० पैकी ७० जागांवर विजय मिळवून दाखवेन.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.