Arvind Kejriwal: "ते पुन्हा सत्तेत आले तर उद्धव ठाकरेंसह अनेकांना तुरुंगात टाकतील" मोदींच्या मिशनचा उल्लेख करत केजरीवालांचे आरोप

Uddhav Thackeray: मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोठी खूप खतरनाक प्लॅन आखत आहेत. त्याचे नाव 'वन नेशन वन लिडर' असे आहे.
Delhi CM Arvind Kejriwal Press Conference
Delhi CM Arvind Kejriwal Press Conference Esakal
Updated on

दिल्ली मद्य घोट्याळ्याच्या प्रकरणी अटकेत असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी जामिन मंजूर करण्यात आला आहे. त्यानंतर केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेत भारतीय जनता पक्षावर सडकून टीका केली.

यावेळी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोठी खूप खतरनाक प्लॅन आखत आहेत. त्याचे नाव 'वन नेशन वन लिडर' असे आहे. त्यामुळे मोदी देशातील सर्व नेत्यांना संपवणार आहेत.

जर मोदी पुन्हा सत्तेत आले तर ते, उद्धव ठाकरे, ममता बॅनर्जी, स्टॅलिन आणि तेजस्वी यादव यांनाही तुरुंगात पाठवतील, आसा आरोप केजरीवालांनी केला. (If Modi comes to power, he will arrest many leaders including Uddhav Thackeray)

अरविंद केजरीवाल यांची काल तिहार कारागृहातून प्रचारासाठी सुटका करण्यात आली आहे. त्यानंतर आज त्यांनी हनुमान मंदिरात पूजा करत पत्रकार परिषद घेतली.

यावेळी केजरीवाल म्हणाले, या देशात आमचा पक्ष छोटा आहे. या छोट्या पक्षातील चार चार नेत्यांना तुरुंगात टाकून पक्ष संपवण्याचा प्रयत्न भाजप करत आहे.

पंतप्रधानांच्या ते भ्रष्ट्राचाराच्या विरोधात लढत आहेत या वक्तव्याचाही केजरीवालांनी चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले, भाजप सर्व भ्रष्ट्राचाऱ्यांना पक्षात घेऊन मोठी मोठी पदे देत आहे. हीच भ्रष्ट्राचाराविरोधात लढाई आहे का?

Delhi CM Arvind Kejriwal Press Conference
Viral Video: ट्रकच्या धडकेत 'छोटा हाती' पलटला अन् बाहेर पडले 7 कोटींचे घबाड

केजरीवालांनी एका मिशनचा उल्लेख करत सांगितले की, पंतप्रधान एक खतरनाक मिशन आखत आहे. या मिशनचे नाव 'वन नेशन वन ईलेक्शन' असे आहे. याद्वारे मोदीजी देशातील सर्व नेत्यांना संपवण्याचा प्रयत्न करत आहेत. विरोधी पक्षांचे जेवढे नेते आहेत, त्या सर्वांना मोदी तुरुंगात टाकणार आहेत. तर भाजपच्या इतर नेत्यांचे राजकारण संपवणार आहेत.

विरोधी पक्षांच्या नेत्यांना होत असलेल्या अटकेवरुनही केजरीवालांनी टीका केली. ते म्हणाले, यांनी विरोधी पक्षांतील संजय सिंह, सत्येंद्र जैन, केजरीवा, स्टॅलिन यांचे मंत्री, ममता दिदींचे मंत्री अशांना अटक केले. आता जर मोदी सत्तेत आले तर ते उद्धव ठाकरे, ममता बॅनर्जी, स्टॅलिन आणि तेजस्वी यादव यांना तुरुंगात टाकतील.

Delhi CM Arvind Kejriwal Press Conference
Viral Video: OYO हॉटेल्स बंद पाडणाऱ्या भाजप आमदाराच्या ऑफिसबाहेरच कपल्सचा रोमान्स? व्हिडिओ होतोय व्हायरल

दिल्ली मद्य घोटळ्याप्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने 21 मार्च रोजी अटक केली होती. तेव्हापासून ते तिहार कारागृहात होते.

दरम्यान देशात लोकसभा निवडणुका सुरू असून, या काळात विरोधी पक्षांना तुरुंगात टाकून लोकशाहीचा गळा घोटला जातोय असा आरोप केजरीवाल करत होती. त्यानंतर त्यांनी निवडणुकीच्या प्रचारासाठी जामिन अर्ज केला होता. या अर्जावर विचार करत न्यायालयाने त्यांना 2 जून पर्यंत जामिन मंजूर केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.