Arvind Kejriwal News : कितीही छळ केला तरी ‘झुकेगा नही’; तुरुंगात जाण्यापूर्वी केजरीवालांची भावनिक साद

Arvind Kejriwal News : मद्यधोरण गैरव्यवहार प्रकरणातील जामिनानंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल दोन जूनला पुन्हा तुरुंगात जाणार आहेत.
Delhi CM Arvind Kejriwal Video Message before interim bail ends on June 2 marathi news
Delhi CM Arvind Kejriwal Video Message before interim bail ends on June 2 marathi news
Updated on


नवी दिल्ली, ता. ३१ : मद्यधोरण गैरव्यवहार प्रकरणातील जामिनानंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल दोन जूनला पुन्हा तुरुंगात जाणार आहेत. तत्पूर्वी, लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्याआधी केजरीवाल यांनी आज व्हिडिओ संदेश जारी करून दिल्लीकरांना भावनिक साद घातली.

मुख्यमंत्री केजरीवाल यांनी जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानले तसेच तुरुंगात छळ होण्याची शंकाही बोलून दाखविली. रविवारी (२ जून) दुपारी तुरुंगात जाण्यासाठी केजरीवाल घरातून बाहेर पडणार आहेत. त्याचा संदर्भ देत केजरीवाल यांनी सांगितले, की कदाचित यावेळी आपला आणखी छळ केला जाईल. परंतु झुकणार नाही. आपल्याला दिल्लीकरांची काळजी असून ते आनंदात असतील तर आपल्यालाही आनंद होईल, अशी टिप्पणी केजरीवाल यांनी केली.

Delhi CM Arvind Kejriwal Video Message before interim bail ends on June 2 marathi news
Delhi Water Crisis : कडाक्याच्या उन्हाळ्यात दिल्लीत पाणी प्रश्न तापला! आप सरकारची सर्वोच्च न्यायालयात घेतली धाव

आपल्याला अनेक मार्गांनी झुकविण्याचा प्रयत्न करण्यात आला, असा दावा करताना केजरीवाल यांनी मधुमेहाचा रुग्ण असूनही तुरुंगात आपले इन्सुलिनचे इंजेक्शन बंद करण्यात आले होते, असा खळबळजनक दावा केला. केजरीवाल म्हणाले, की वीस वर्षांपासून आपल्याला मुधमेहाचा गंभीर त्रास होत आहे. मागील दहा वर्षांपासून दररोज इन्सुलिनचे इंजेक्शन घेतले जात आहे. दिवसातून चार आपण वेळा पोटात इंजेक्शन इंजेक्शन घेत असतो. मात्र तुरुंगात असताना आपले इन्सुलिनचे इंजेक्शन बंद केले. त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण प्रचंड वाढले होते.अशीच स्थिती राहिल्यास मूत्रपिंड आणि यकृतावर गंभीर परिणाम होऊ शकतो. मागील ५० दिवसांच्या तुरुंगवासाच्या काळात आपले वजन सहा किलोने कमी झाल्याचे सांगताना केजरीवाल म्हणाले, की आपले वजन आधी ७० किलो होते आता ६४ किलो झाले आहे. तुरुंगातून बाहेर आल्यानंतरही वजन वाढत असून हे एखाद्या गंभीर आजाराचे लक्षण असल्याचे डॉक्टर सांगत आहेत.

Delhi CM Arvind Kejriwal Video Message before interim bail ends on June 2 marathi news
Pune Porsche Accident : कल्याणीनगर अपघातानंतर अनधिकृत बारवरील कारवाई मंदावली... राजकीय आश्रय असल्याने टाळाटाळ?

आपण तुरुंगात असलो किंवा बाहेर असलो तरी दिल्लीची कामे थांबू देणार नाही. मोहल्ला क्लिनिक, रुग्णालये, २४ तास वीज, शिक्षण या सुविधा मिळत राहतील. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर महिलांना एक हजार रुपये दरमहा देण्याची योजना सुरू करण्यात येईल, असेही केजरीवाल म्हणाले. आपण दिल्लीकरांसाठी कुटुंबातील व्यक्ती म्हणून काम केले आहे. आता दिल्लीकरांनी आपल्या कुटुंबीयांसाठी प्रार्थना करावी, असे भावनिक आवाहन करताना केजरीवाल यांनी आईवडिलांच्या वार्धक्याचा हवाला देत त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करण्याची साद दिल्लीकरांना घातली. पत्नी सुनीता केजरीवाल कणखर असून कठीण प्रसंगात त्यांनी साथ दिल्याची प्रशंसा अरविंद केजरीवाल यांनी केली.

आपण सर्व मिळून हुकूमशाहीशी लढत आहोत. या लढाईत आपल्याला काहीही झाले तरी दिल्लीकरांनी दुःखी होऊ नये. त्यांचे आशीर्वाद आपले रक्षण करतील.
अरविंद केजरीवाल, मुख्यमंत्री

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.