Court Decision : सायकलस्वारही आता वाहन चालक; न्यायालयाचा निर्णय, मृतांच्या नातेवाईकांना द्यावे लागले 38 लाख

Court Decision
Court Decision
Updated on

दिल्लीतील न्यायालयाने काल (शनिवार) महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. रस्ता अपघातात जीव गमावलेल्या सायकलस्वाराच्या कुटुंबीयांना 38 लाख रुपयांची भरपाई देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. हा आदेश देताना सायकलस्वारालाही रस्त्यावरील वाहनचालक समजावे, अशी टिप्पणी न्यायालयाने केली. लाईव्ह हिंदुस्तानने याबाबत वृत्त दिले आहे.

कडकडडूमा न्यायालयाने हा निर्णय दिला. न्यायाधीश हारुण प्रताप यांनी या प्रकरणी सरकार आणि लोकांच्या जागरूकतेवर भाष्य केले.

दिल्लीच्या रस्त्यांवर सायकल चालवण्यासाठी काही नियम आहेत. त्याच्या अंमलबजावणीची पहिली जबाबदारी सरकारची आहे. शासनाने सायकल ट्रॅक बनविण्याचे काम यापूर्वीच सुरू केले आहे. परंतु, आतापर्यंत ही केवळ अर्धवट योजना आहे. ज्या ठिकाणी ट्रॅक बनवले आहेत, त्यांचा वापर केला जात नाही. वाहतूक पोलिसांनी या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. याबाबत जनजागृती मोहीम राबविण्याची जबाबदारीही सरकारी विभागाची आहे, असे न्यायाधीशांनी म्हटले आहे.

Court Decision
Odisha Train Accident : रेल्वे अपघाताचे असलेले कारण 'इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग' नेमकं आहे तरी काय?

देवेंद्र हा सोनिया विहार परिसरात गॅस सिलिंडरचा पुरवठा करायचा. 27 जुलै 2021 रोजी एका वेगवान कारने त्याच्या सायकलला धडक दिली. यामध्ये देवेंद्र यांचा मृत्यू झाला होता. देवेंद्र (25) यांच्यावर आई आणि चार लहान भावंडांच्या संगोपनाची जबाबदारी होती. आर्थिक परिस्थिती बिकट होती. त्यामुळे न्यायालयाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली.

अधिवक्ता उपेंद्र सिंह म्हणाले की, बाह्य रिंगरोड, मुख्य रस्ते, राष्ट्रीय महामार्ग इत्यादी मुख्य रस्त्यांवर सायकल चालवता येत नाही. स्वतंत्र ट्रॅक असेल तरच या ठिकाणी सायकल चालवता येईल. पण, या रस्त्यांवर सायकल चालवल्या जाते  चालत असल्याचे सामान्यतः दिसून येते. पोलिसांनी सायकल स्वारांना येथे येण्यापासून रोखावे.

Court Decision
टाटांना सॅल्यूट! सामाजिक बंधने झुगारुन LGBTQIA+ समुदायाला देखील नोकऱ्यांमध्ये करुन घेतलं सहभागी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()