दिल्ली न्यायालयाने सीबीआयला अॅम्नेस्टी इंटरनॅशनल इंडिया संस्थेचे माजी प्रमुख आकार पटेल यांच्या विरोधात जारी केलेले लुक-आउट नोटीस त्वरित मागे घेण्याचे निर्देश दिले.
सीबीआयने गेल्या डिसेंबरमध्ये अॅम्नेस्टी इंडिया आणि त्याचे माजी प्रमुख आकार पटेल यांच्याविरुद्ध विदेशी योगदान (नियमन) कायदा, 2010 चे उल्लंघन केल्याबद्दल आरोपपत्र दाखल केले होते.
आकार पटेल यांनी अलीकडेच सीबीआयने त्याच्याविरुद्ध जारी केलेल्या लुकआउट परिपत्रकाच्या (एलओसी) विरोधात न्यायालयात धाव घेतली होती. मॅजिस्ट्रेट कोर्टाने सीबीआयला लुक आऊट नोटीस मागे घेण्यास सांगितले
अॅम्नेस्टी इंटरनॅशनल इंडिया संस्थेचे माजी प्रमुख आकार पटेल यांना बंगळुरू विमानतळावरून अमेरिकेस निघालेले असताना अधिकाऱ्यांनी मनाई केली होती. त्याविरुद्ध त्यांनी दिल्ली न्यायालयात दाद मागितली. न्यायालयाने केंद्रीय अन्वेषण विभागास (सीबीआय) नोटीस बजावली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.